राज्यमंत्री दत्ता मामा भरणे सोलापूर चे नवे पालकमंत्री

राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांची सोलापूरच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर चे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना मुंबई च्या फॉरटीज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्यमंत्री दत्ता मामा भरणे सोलापूर चे नवे पालकमंत्री

सोलापूर/ प्रतिनिधी


राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांची सोलापूरच्या
पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूर चे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना मुंबई च्या फॉरटीज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने जिल्ह्यातील कोरोना चे संक्रमण मोठया प्रमाणात वाढले आहे सद्या जिल्ह्याचा सर्व भार एकटे जिल्हाधिकारी हेच सांभाळत असून त्यांना इतर प्रशासनाच्या इतर खात्याची म्हणावी तशी साथ मिळेनाशी झाली आहे. सोलापूर महानगरपालिका आयुक्त तर असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली आहे. त्यातच पूर्ण एक महिना ही झाला नव्हता तत्कालीन पालकमंत्री दिलिप वळसे पाटील यांना काढून जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली  होती, पण जितेंद्र आव्हाड हे आजारी पडल्यामुळे सोलापूर जिल्ह्याकडे लक्ष देण्यासाठी कोणी राहिले नव्हते त्यातच कोरोना ने सोलापूर मध्ये धुमाकूळ घातला आहे अशा परिस्थितीत जिल्ह्याला पालकमंत्री नसणे गंभीर होते त्यामुळे मुख्यमंत्री यांनी तात्काळ इंदापूर चे आमदार असलेले राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या वर सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी टाकली आहे.