आनंदाची बातमी ; उजनी धरणात आठ दिवसांत सव्वादोन टीएमसी पाणीसाठा

आनंदाची बातमी  ; उजनी धरणात आठ दिवसांत सव्वादोन टीएमसी पाणीसाठा

सोलापूर/महेश गायकवाड

सोलापूर, पुणे, अहमदनगर या तीन जिल्ह्यांचे लक्ष लागून असलेल्या उजनी धरणाची पाणीपातळी मृग नक्षत्राच्या पावसाने संथगतीने वाढत आहे. उजनी जलाशय परिसरात मागील आठवड्यात पडलेल्या पावसाने आतापर्यंत सव्वादोन टीएमसी पाणीसाठा उजनीत जमा झालेला आहे.

१५ जूनला उजनीच्या उपयुक्त पाण्याची टक्केवारी वजा २२ टक्के होती तर २४ जूनला वजा १८.८१ टक्के झाली. दौंड येथून अजूनही २४७० क्युसेकने पाण्याची आवक सुरूच आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात पाण्याच्या दोन पाळ्या सुटल्याने सोलापूर जिल्ह्यातील अनेक योजना उन्हाळ्यातसुद्धा कार्यान्वित होत्या़ तसेच सोलापूरसह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा या शहरांना योग्य नियोजनामुळे मुबलक पाणी मिळाले आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला उजनीची पाणीपातळी वजा ५८.५७ होती.

◼उजनीची सद्यस्थिती

एकूण पाणीपातळी ४८९.४७५ मीटर

एकूण पाणीसाठा १५१७.३६ दलघमी

उपयुक्त पाणीसाठा वजा २८५.३६ दलघमी

टक्केवारी वजा १८.८१ टक्के

दौंडमधून आवक २४७० क्युसेक