महिलेची दोन लहान मुलांसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

महिलेची दोन लहान मुलांसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

सोलापूर / महेश गायकवाड
अज्ञात कारणावरुन एका महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी १२ मे रोजी रात्री भोयरे (ता. मोहोळ) येथे घडली आहे. या घटनेने संपुर्ण भोयरे गाव हादरून गेले असून महिलेने मुलांसह का आत्महत्या केली असावी अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे स्वाती कैलास साठे असे मृत महिलेचे नाव आहे तर अभिजित साठे वय 6 वर्षे आणि परी साठे वय 4 वर्षे असे मुलांचे नावे आहेत .घरगुती कारणावरून या महिलेने आत्महत्या केली असल्याचे कळते.
दरम्यान मोहोळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून
याचा    कसून तपास करत आहेत.ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.