सोनभद्र येथील गोळीबाराचा रिपाइं कडून तीव्र निषेध      

सोनभद्र येथील गोळीबाराचा रिपाइं कडून तीव्र निषेध      

   

सोलापूर / प्रतिनिधी         

                 उत्तरप्रदेश मधील सोनभद्र या गावी तेथील गावचे सरपंच व उपसरपंच या दोघांनी जमिनीच्या वादातून गावामध्ये घुसून जवळ जवळ ३०० लोकांना घेवून आदिवाशी शेतकरी जमावावर भ्याड हल्ला केला तसैच बेछुट गोळीबार करून १०  निष्पाप, आणि निरापराध, आदिवाशी शेतकरी बांधवांचा जीव घेतला. त्यासर्व गुन्हेगार लोकांवरती सदोष मनुष्य वधाचा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने  (गवई गट) केली असून  या कृत्याचा रिपाईच्या वतीने जाहीर तीव्र निषेध करण्यात आला आहे.                                                                      गेल्या पाच वर्षापासून उत्तर प्रदेश, बिहार,  या राज्यामध्ये दलित,मुस्लिम,आदिवाशी, समाजाला हिंदुत्वाच्या नावाखाली बळी बनविले जात आहे . भाजपाप्रणित केंद्र व राज्य सरकार झुंडशाहीला बळ देत आहे त्यामूळे अल्पसंख्याक, दलित, मुस्लिम समाज भयभीत झालेला आहे . या सर्व प्रकारास संबंधीत सरकारनी आटकाव घालावा अन्याथः रिपाईच्या वतीने उग्र अांदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपाइं चे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष  सुबोध वाघमोडे, प्रा.डाॅ.राजकुमार सोनवले,अशफाक शेख, बाबु लालसरे, रावसाहेब परिक्षाळे, मुन्ना पठाण, यांनी पञकाद्वारे दिला आहे.                                                                                                                   सोनभद्र येथील घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी असून सरकारने यातील दोषींवर कारवाई न केल्यास पक्ष देशभरात आंदोलन उभे करेल असेही वाघमोडे यांनी जाहीर केले आहे.