राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेत सहभागाचे आवाहन

राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेत सहभागाचे आवाहन

प्रेमलाताई चव्हाण स्मृती स्पर्धा
राज्यस्तरीय विनोदी कथा


कराड / प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमीच्या वतीने आयोजित केल्या जाणाNया प्रेमलाताई चव्हाण स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेसाठी आपल्या कथा पाठवण्याचे आवाहन अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी केले आहे. 
मागील पिढीत एकाहून एक सरस विनोदी लेखकांची फळी होती. त्यांच्या कथा - कादंबNयांवर वाचकांच्या उड्या पडायच्या. अशा विनोदी लेखकांचे कथाकथनाचे कार्यक्रम तुफान गाजले होते. परंतु त्यांच्यानंतर तसे लेखक फारसे घडले नाहीत. ही विनोदी लेखनाच्या बाबतीत जाणवणारी पोकळी भरून काढण्याच्या उदात्त हेतुने विनोदी लेखन व लेखक यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून अकादमीच्या वतीने ही स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेला राज्याच्या कानाकोपNयातून मोठा प्रतिसाद मिळत असतो. महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाNया या विनोदी कथा स्पर्धेचे हे सतरावे वर्ष आहे, असे डॉ. चेणगे यांनी सांगितले.
ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून लेखकांनी आपली सुटसुटीत विनोदी कथा कागदाच्या एका बाजुस सुवाच्च अक्षरात लिहून अथवा टाईप करून गुंफण अकादमी, द्वारा विकास धुळेकर, १४६ अ, साईलीला अपार्टमेंट, प्रतापगंज पेठ, सातारा (मोबाईल ९८५०६५९७०९ / ९८८१७३९७१०) या पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. अकादमीच्या वतीने आयोजित केल्या जाणाNया गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त लेखकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.