ना.बाळासाहेब पाटील यांची उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर घेतला आढावा

सहकार आणि पणन मंत्री तसेच सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांनी अचानकपणे प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज येथे कोरोना महामारीच्या संदर्भात भेट दिली.यावेळी त्यांनी उपाययोजना बाबत आढावा घेऊन डॉ.संजय कुंभार यांना योग्य त्या सूचना केल्या.

ना.बाळासाहेब पाटील यांची उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट  कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर घेतला आढावा

उंब्रज/प्रतिनिधी

सहकार आणि पणन मंत्री तसेच सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांनी अचानकपणे प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज येथे कोरोना महामारीच्या  संदर्भात भेट दिली.यावेळी त्यांनी उपाययोजना बाबत आढावा घेऊन डॉ.संजय कुंभार यांना योग्य त्या सूचना केल्या.

याबाबत फोनवरून ना.बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला असता सातारा येथे आढावा संदर्भात बैठक असल्याकारणाने चाललो असता उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्र कोरोना बाबतच्या उपाययोजनाची अंमलबजावणी कशी करत आहे तसेच लोकांच्या तपासणी बाबत काही शंका होत्या याबाबत योग्य त्या मार्गदर्शक सूचना करण्यासाठी उंब्रज येथील आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली असल्याचे सांगितले मुंबई पुण्यावरून तसेच परदेशातून आलेल्या लोकांच्या तपासणी बाबत सर्व परिस्थिती जाणून घेतली तसेच कराड उत्तरसह राज्याच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सर्व मंत्रिमंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब बारकाईने लक्ष ठेऊन असल्याचे त्यांनी सांगितले प्रशासन पूर्ण तयारीने कोरोना महामारीचा सामना करत आहे.जनतेने सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे तसेच घरातच राहावे प्रसंग बाका असला तरी आपण सर्वजण याचा धैर्याने सामना करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.