वहागावात स्वस्त धान्य दुकानदाराची ग्राहकांस दमदाटी, दुकानदाराविरुध्द तळबीड पोलिसांत तक्रार

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर धान्य वाटप सुरु झाल्याची माहिती घेण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला आज वहागाव (ता. कऱ्हाड) येथील स्वस्त धान्य दुकानदार व त्याच्या सहकाऱ्यांनी शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात तळबीड पोलिसांत अदखलपात्र तक्रार दाखल झाली आहे.

वहागावात स्वस्त धान्य दुकानदाराची ग्राहकांस दमदाटी,   दुकानदाराविरुध्द तळबीड पोलिसांत तक्रार

उंब्रज / प्रतिनिधी

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर धान्य वाटप सुरु झाल्याची माहिती घेण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला आज वहागाव (ता. कऱ्हाड) येथील स्वस्त धान्य दुकानदार व त्याच्या सहकाऱ्यांनी शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात तळबीड पोलिसांत अदखलपात्र तक्रार दाखल झाली आहे.

स्वस्त धान्य दुकानदार गौतम शंकर ताटे व जयवंत जगन्नाथ पवार (दोघेही रा. वहागाव, ता. कऱ्हाड) अशी तक्रार दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वहागाव (ता. कऱ्हाड) येथे आज सकाळी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर येथील स्वस्त धान्य दुकानात धान्य वाटप सुरु झाल्याची माहिती मिळाल्यानंतर गावातील ग्राहक मनोज निवास पवार व अन्य ग्राहक स्वस्त धान्य दुकानात सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास गेल्यानंतर दुकानदार गौतम शंकर ताटे व त्याचा सहकारी जयवंत जगन्नाथ पवार यांनी मनोज पवार व सोबतच्या अन्य युवकास याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करुन मनोज पवार यांना शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार मनोज निवास पवार रा.वहागाव यांनी तळबीड पोलिसांत दिली आहे. घटनेची नोंद तळबीड पोलिसांत झाली असून सहाय्यक फौजदार सुरेश पिसाळ या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.