वनवासमाची खून प्रकरण पेटवायला माचीस काढली अन फसला

तामिळनाडू,बेंगलोर,विजापूर,पुणे सपोनि राहुल वरोटे यांची तपासासाठी भिरकीट

वनवासमाची खून प्रकरण पेटवायला माचीस काढली अन फसला

पुणे बेंगलोर वर्दळीचा महामार्ग,सहापदरीकरणाचे काम जोमात सुरू, डांबरीकरण, खडीकरण आणि नाला बांधणी काही ठिकाणी पूर्णत्वास गेली आहे अशातच वनवासमाची ता.कराड गावच्या हद्दीत एका तरुणाचे शरीर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला, कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर, तळबीड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे व त्याची संपूर्ण टीम तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.घटना गंभीर आणि अतिशय नियोजनबद्ध घडवलेली यामुळे पोलिसांना तपासात सुरुवाती पासूनच अनेक समस्या निर्माण व्हायला लागल्या होत्या सर्वात महत्त्वाचे खून झालेली व्यक्ती बाबत माहिती मिळणे महत्त्वाचे असताना तळबीड पोलीस ठाण्याचे वाहतूक विभागातील निलेश विभूते यांना घटनास्थळी एक पावती सापडली आणि खुनाचा उलगडा होण्याचा मार्ग मोकळा झाला.

 

वनवासमाची येथे नाल्यात पेटवून दिलेल्या प्रेताच्या आसपास कोणताही सकृतदर्शनी पुरावा पोलिसांना सापडत नव्हता सुतावरून स्वर्ग गाठणारी पोलीस यंत्रणा घटनास्थळी काही सापडते का याच्या शोधात असताना वाहतूक पोलीस निलेश विभूते यांना बेंगलोर येथील एका पेट्रोल पंपाची रिसीट सापडली लागलीच ही माहिती त्यांनी सपोनि राहुल वरोटे यांना दिली तपासकामात तज्ञ असलेल्या वरोटे यांनी तात्काळ वेळ न दवडता आपले काम सुरू केले आणि सुरू झाले तपासकार्य एका अतिशय क्लिष्ट आणि पावती वगळता कोणताही सकृतदर्शनी पुरावा नसलेल्या अतिशय गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे शोध मोहिमेचा.

 

युवकाला पेटवून दिलेल्या खून प्रकरणात तपासाला सुरूवात करताना कोणतीही माहिती नव्हती तसेच पुरावा देखील नव्हता कर्नाटक मध्ये पेट्रोल भरल्याची पावती हीच काय ती तपासाची दिशा सकाळी ९ वाजता पोलीस पथक घटनास्थळी होते आणि १०.३० वा.मयत व संशयित आरोपी कर्नाटकातील आहेत या बाबीवर तपासाची दिशा ठरली.यानंतर सपोनि राहुल वरोटे यांनी तपास कामाला सुरुवात केली सोबतीला पोलीस कर्मचारी निलेश विभूते आणि ओंबासे व तपासाची ठिकाणे होती तामिळनाडू, बेंगलोर,विजापूर आणि पुणे दिवसातून एकवेळ जेवण बाकी वेळ तपासात व्यतीत करीत तिघांचे पथक मजल दरमजल करीत एक एक आरोपी निष्पन्न करीत ताब्यात घेत होते आणि एक एक धक्कादायक माहिती पोलिसांना तपासाची दिशा देत होते.

 

मृत झालेल्या युवकाला जाळून मारण्याचा प्लॅन हा बहुधा बेंगलोर मध्येच ठरला असणार कारण पाच लिटर पेट्रोल हे तिथेच घेतले होते तर कराड जवळील एका पंपावर गाडीत डीझल भरले होते यामुळे पेटवून मारलेल्या युवकाचा प्रथमतः गळा आवळून गाडीतच खून केला परंतु थोडीशी धुकचुकी शिल्लक असल्याने वनवासमाची गावच्या हद्दीत महामार्गालगत नाल्यात पेटवून दिले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या दरम्यान एका संशयित आरोपीने खिशातून कडीपेटी काढली मात्र हे करताना पेट्रोल भरल्याची पावतीही घटनास्थळी पडली आणि सुरू झाली तपासाची दिशा हातात आलेल्या एका पुराव्याची हाच पुरावा पोलिसांना महत्वाचा ठरला आणि सुता वरून स्वर्ग गाठता आला.