अवैध चायनीज बनावटीची पिस्टल पकडले

बेलवडे हवेली हद्दीतील घटना;माजी सैनिक पोलिसांची धाडसी कारवाई

अवैध चायनीज बनावटीची पिस्टल पकडले

 

अवैध चायनीज बनावटीची पिस्टल पकडले

 

बेलवडे हवेली हद्दीतील घटना;माजी सैनिक पोलिसांची धाडसी कारवाई

 

उंब्रज / प्रतिनिधी

 

दोन माजी सैनिक पोलिसांची धाडसी कारवाई

 

पो.काँ.प्रवीण फडतरे आणि निलेश विभूते यांनी सोमवार दि.१ रोजी रात्री ८.३० वा काळोख्या अंधारात केलेल्या धाडसी कारवाईत दोघा संशयित आरोपींना पिस्टलसहित ताब्यात घेतले.टोलनाका परिसरात वाहतूक नियमन करणारे माजी सैनिक पो कॉ निलेश विभूते यांना परजिल्ह्यातील गोपनीय खबऱ्यांच्या हवाल्याने पिस्टल बाबत माहिती मिळाल्यानंतर तळबीड पो ठाण्याचे दुसरे कर्मचारी व माजी सैनिक प्रवीण फडतरे याच्या सोबतीने धाडसी कारवाई केली आणि दोघांच्या मुसक्या आवळल्या.यामुळे दोन माजी सैनिक पोलिसांच्या कारवाईचे स्वागत सर्वच स्थरातून होत आहे.

 

अवैध चायनीज बनावटीचे पिस्टल बाळगल्याप्रकरणी तळबीड पोलिसांनी कराड तालुक्यातील बेलवडे हवेली येथील मारुती मंदीराच्या पाठीमागील बोळात दोघां जणांना रंगेहाथ पकडले.पोलिसांनी संशयितांकडून ५० हजार रुपये किंमतीचे चायनीज बनावटीचे पिस्टल हस्तगत केले आहे. सदरची कारवाई ही दि.१ रोजी रात्री पावने नऊ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे.यामध्ये माजी सैनिक व तळबीड पोलीस ठाण्याचे कर्मचारी पो कॉ  निलेश विभूते आणि प्रवीण फडतरे यांनी धाडसी कामगिरी केली.

 

योगेश अकुंश पवार (वय३७), समाधान जालिंधर देशमुख (वय १९)दोन्ही रा.बेलवडे हवेली ता. कराड अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, कराड तालुक्यातील बेलवडे हवेली येथे युवकाकडे पिस्टल असल्याची माहिती तळबीड पोलिस ठाण्याच्या सपोनि जयश्री पाटील यांना समजली होती.त्या अनुषंगाने पाटील यांनी विशेष पथकातील सहा.पोलीस फौजदार सुर्यकांत देशमुख, पो.ना संदेश दिक्षीत,पो.कॉ-प्रविण फडतरे, पो.कॉ निलेश विभुते यांनी बेलवडे हवेली गावात अवैध्द शस्त्र बाळगणारा संशयित योगेश पवार याची माहिती काढुन स.पो.नि. जयश्री पाटील यांनी पथकाच्या समवेत पिस्टलधारी युवकांना पकडुन त्यांच्याकडुन चायना बनावटीचे पिस्टल जप्त करून दोघा जणांना अटक केली.गुन्हयाचा तपास स.पो.नि.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस फौजदार मुळीक हे करीत आहेत.