तांबवे येथील पूल कोसळला

तांबवे येथील पूल कोसळला

तांबवे येथील जुना पुल कोसळला

कराड/प्रतिनिधी :
                        येथील कोयना नदीवरील जुना पुल बुधवारी पहाटे कोसळला आहे. मात्र, 29 जुलै रोजी कराड येथील कृष्णा नदीवरील जुना कृष्णा पुल कोसळल्या घटना घडली होती. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ सुरक्षेच्या दृष्टीने या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. परंतु, बुधवारी पहाटे हा पुल कोसळला असून पुलावरून वाहतूक बंद असल्याने यामध्ये मोठी जीवितहानी टळली आहे. 
                      2016 मध्ये सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पुल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर राज्य सरकारकडून सर्व ब्रिटिशकालीन व अन्य जुने पुल वाहतुकीस बंद केले होते. यावेळीच तांबवे येथीलही जुना पुल वाहतुकीस पूर्णपणे बंद करण्यात आला होता. त्यानंतर नवीन पुलाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते. त्यामुळे व अन्य जवळचा मार्ग नसल्याने हा पुल पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. मात्र, 29 जुलै रोजी कराड येथील कृष्णा नदीवरील जुना कृष्णा पुल कोसळल्या घटना घडली. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ सुरक्षेच्या दृष्टीने तांबवे पुलावरीलही वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. 

प्रशासनाची सतर्कता, सर्व स्तरातून कौतुक 

कराड येथील कृष्णा नदीवरील जुना कृष्णा पुल 29 जुलै रोजी कोसळला होता. परंतु, हा ब्रिटिशकालीन पुल वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांसह कृष्णा पुल बचाव समितीने प्रयत्न केले होते. मात्र, प्रशासनाने तात्काळ सुरक्षेच्या दृष्टीने कठोर भूमिका घेत जुना कृष्णा पुल बंद वाहतिकीसाठी बंद करून नजीकच्या नवीन कृष्णा पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू केली होती. जुन्या पुलावरची वाहतूक बंद केल्याने सावित्रीसारखी मोठी दुर्घटना टळल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ तांबवे पुलावरील वाहतूकही पूर्णपणे बंद केली होती. त्यामुळे आज होणारी संभाव्य दुर्घटना टळली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या सतर्कतेबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे.