...तर फायनान्स कंपन्यांच्या वसुली अधिकाऱ्यांना झोडपून काढू

कोरोना काळात सक्तीची कर्जवसुली करण्यात येवू नये, असे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. तरीही काही मायक्रो फायनान्स कंपन्या अजूनही सक्तीची कर्जवसुली करत आहेत. ही कर्जवसुली यापुढेही अशीच चालू राहिल्यास संबंधित वसुली अधिकाऱ्यांना झोडपून काढू. तसेच वसुली न थांबल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही बळीराजा शेतकरी संघटनेने दिला आहे. 

...तर फायनान्स कंपन्यांच्या वसुली अधिकाऱ्यांना झोडपून काढू
कराड : प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देताना साजिद मुल्ला, संघटनेचे पदाधिकारी व कर्जदार महिला

... तर फायनान्स कंपन्यांच्या वसुली अधिकाऱ्यांना झोडपून काढू

बळीराजाचा इशारा : प्रांताधिकाऱ्यांना निवेदन, सोमवारी प्रांत कार्यालयात बैठक, वसुली न थांबल्यास ठिय्या आंदोलन 

कराड/प्रतिनिधी :
          कोरोना काळात सक्तीची कर्जवसुली करण्यात येवू नये, असे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. तरीही काही मायक्रो फायनान्स कंपन्या अजूनही सक्तीची कर्जवसुली करत आहेत. ही कर्जवसुली यापुढेही अशीच चालू राहिल्यास संबंधित वसुली अधिकाऱ्यांना झोडपून काढू. तसेच वसुली न थांबल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही बळीराजा शेतकरी संघटनेने दिला आहे. 
          मायक्रो फायनान्स कंपन्यांनी चाललेली सक्तीची कर्जवसुली थांबवण्यात यावी, या मागणीचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी 8 रोजी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख व सातारा जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, कामगार नेते अनिल घराळ, जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी, गणेश पवार, अखिल भारतीय मराठा युवक महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद डुबल, संदीप लोंढे व कर्जदार महिला, कार्यकर्ते उपस्थित होते. 
         दरम्यान, बळीराजाच्या निवेदनाची दखल प्रांताधिकाऱ्यांनी घेतली असून सोमवारी 12 रोजी दुपारी मायक्रो फायनान्स कंपनीचे अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग प्रांत कार्यालयात बोलावली असल्याची माहितीही जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिली. 

*सविस्तर वृत्तासाठी वाचा उद्याचा दैनिक प्रीतिसंगम* 

विभागीय आयुक्तांचे आदेश डावलून ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची कर्जवसुली चालू आहे. यापुढेही जर अशीच कर्जवसुली चालू राहिल्यास संबंधित वसुली अधिकाऱ्यांना संघटना झोडपून काढेल. प्रांताधिकाऱ्यांनी सोमवारी फायनान्स कंपनी अधिकाऱ्यांशी बैठक आयोजित केली असून त्यामध्ये होणाऱ्या निर्णयानंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल. 
         - साजिद मुल्ला (जिल्हाध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना)