जे.सी.बी च्या हिशोबावरून तुंबळ हाणामारी तारळे ता.पाटण येथील घटना; दोन गटातील १७ जणांवर गुन्हा दाखल

जे.सी.बी च्या हिशोबावरून तुंबळ हाणामारी  तारळे ता.पाटण येथील घटना; दोन गटातील १७ जणांवर गुन्हा दाखल

उंब्रज / प्रतिनिधी

जे.सी.बी च्या हिशोबाच्या कारणावरून चिडून जाऊन तारळे ता.पाटण येथील दुरूग नावचे शिवारात दोन गटातील युवकांच्यात शिवीगाळ करत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शनिवार दि.२ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.याप्रकरणी तारळे दूरक्षेत्रात १७ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

आशिष अविनाश यादव (वय२३),अमित क्रष्णात जाधव (वय२१),ऋषीकेश शशिकांत जाधव (वय२१),अनिकेत अशोक इदाते (वय२१),अजय संभाजी इदाते (वय२७),ओमकार अविनाश यादव (वय२१),अनिकेत संजय आवले,विजय लक्ष्मण जाधव,विशाल संजय जाधव,अक्षय विश्वास भोसले,नितीन सुदाम माळी,आतिश बजीरंग पवार, आकाश विश्वास भोसले,अक्षय विश्वास भोसले सर्व रा.तारळे ता.पाटण,अभिजीत ज्ञानेश्वर इंगळे (वय२४),शुभभ विलास कणसे दोघे रा.भरतगांव ता.जि.सातारा,मिथून राठोड रा.पाली ता.कराड अशी मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत.याबाबत तारळे दूरक्षेत्राचे हवालदार विशाल साहेबराव नलवडे यांनी फिर्याद दिली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक एम.एस.तलबार करीत आहेत.