वेळ राजकारण करण्याची नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात चांगले काम करीत असल्याच्या प्रतिक्रिया इतर राज्यातील मुख्यमंत्र्यानीही दिल्या आहेत. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी म्हटले आहे कि, एखाद्या विषाणूशी लढतांना ठोस तयारी आणि आतमविश्वास महत्वाचा आहे. तरच आम्ही या  वातावरणात टिकू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाला हटविण्याची जय्यत तयारी ठेवली असून आरोग्य प्रशासन योग्य पद्धतीने काम करत आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना साथ देणे गरजेचे आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही. 

वेळ राजकारण करण्याची नाही
वेळ राजकारण करण्याची नाही

वेळ राजकारण करण्याची नाही 

                                                      कृष्णाकाठ / अशोक सुतार 

         महाराष्ट्र सध्या करोनाच्या संकटाशी तोंड देत आहे. राज्यात राजकारण  आहे. रिझाईन उद्धव असा हॅश टॅग वापरून विरोधक जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून जनतेशी संवाद साधला. या संवादावेळी उद्धव यांनी जनतेला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सुरु असलेल्या कोरोनाबाबतच्या कार्याची माहिती दिली आहे. २३ मार्चला सुरु झालेला लॉकडाऊन ३ मेला संपणार असून जिथे कोरोनाची परिस्थिती धोकादायक असेल तिथे हा लॉकडाऊन वाढवणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी सूचित केले आहे. देशातील एकूण करोनाग्रस्त रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. तर राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहे. तसेच राज्याच्या काही भागातही करोनामुळे परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. लॉकडाउनमुळे करोनाच्या प्रसाराचा वेग कमी झाला असला, उद्योगधंदे बंद असल्याने राज्याचे अर्थचक्र ठप्प झाले आहे. त्यामुळे ३ मे नंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार याविषयी सगळ्यांच्याच मनात प्रश्न आहे. या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. राज्य पोलीस दलातील करोनामुळे मरण पावलेल्या पोलिसांविषयीही मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला. सध्या करोनाविरोधातील या लढ्यात आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसह पोलीस दल तणावाखाली काम करत आहे. स्वतःच्या घराचा, आयुष्याचा विचार न करता ही माणसं रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत. त्यातच मुंबईत दोन पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मी महाराष्ट्राच्या वतीने आणि सरकारच्या वतीने त्यांना आंदराजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांसाठी सरकार जे जे शक्य असेल ते करेल. पण, माणूस गेला आहे अशी खंत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यानी यावेळी टीकाकारांना चांगलेच उत्तर दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात चांगले काम करीत असल्याच्या प्रतिक्रिया इतर राज्यातील मुख्यमंत्र्यानीही दिल्या आहेत. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी म्हटले आहे कि, एखाद्या विषाणूशी लढतांना ठोस तयारी आणि आतमविश्वास महत्वाचा आहे. तरच आम्ही या  वातावरणात टिकू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाला हटविण्याची जय्यत तयारी ठेवली असून आरोग्य प्रशासन योग्य पद्धतीने काम करत आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना साथ देणे गरजेचे आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही.                                                                                                              पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी परिस्थितीवर चर्चा करणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य सरकारच्या भविष्यातील नियोजनाची कल्पना देऊ शकतात. कोरोनावर नियंत्रणाबरोबर सरकारकडून महसूलाचे मार्ग सुरू करण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. तसे संकेतही मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी आधीच दिले आहेत. त्यामुळे ३ मे नंतरचे नियोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चारचा झाल्यानंतरच होऊ शकते. लॉकडाऊन दि. ३ मे संपणार आहे. परंतु नागरिकांनी घाई करणे चुकीचे ठरणार आहे.आलॉकडाऊन संपले याचा अर्थ असा नाही की लोकांनी गर्दी करावी. लोकांनी गर्दी टाळून आपापली कामे शांतपणे करणे फायद्याचे होणार आहे. अन्यथा कोरोनामुळे जास्त बाली जाण्याची भीती आहे. लॉकडाऊन संपले की सर्व काही संपले असे नाही, हे जनतेने ध्यानात घेऊन राज्य सरकारला आणि आरोग्य प्रशासनाला सहकार्य करायचे आहे.ग्रामीण भागात जिल्ह्यांच्या वेशी उघडणार नसल्या तरी जिल्हातंर्गत काही उद्योग आणि इतर व्यवहार सुरु राहणार आहेत.मुख्यमंत्री राज्यातील जिल्हानिहाय दररोजचा अहवाल पाहत आहेत. सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर इ.  शहरांत कोरोनाचे जास्त रुग्ण आढळत आहेत. याबद्दल प्रशासनाला आणि नागरिकांना काळजी घ्यावी लागेल. नागरिकांनी शारीरिक अंतर ठेवून सर्व व्यवहार करावे, उद्योग सुरु झाले तर बरीचशी काळजी घ्यावी लागणार आहे. अन्यथा लोक जर निष्काळजीपणे राहू लागले तर कोरोनाची साथ आटोक्यात येणार नाही. हे गांभीर्य प्रत्येक नागरिकाला पाळावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे. महाराष्ट्रातील नागरिक जबाबदारीने वागतील अशी अपेक्षा आहे.                                                                                                                          महाराष्ट्रात 1 लाख 8972 चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 1 लाख 1162 नमुने निगेटिव्ह आले आहेत. यापैकी 7628 इतके जण पॉझिटिव्ह रुग्ण असून आत्तापर्यंत राज्यात  323 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून जनतेशी संवाद साधल्यावर काही महत्वाचे मुद्दे जनतेसमोर मांडले आहेत. तसेच राज्यातील सध्याची परिस्थिती आणि पुढे काय करणार यावर प्रकाश टाकला. उद्धव ठाकरे म्हणाले की, हल्ली सगळे दिवस सारखे झालेत. हे कोणालाच अपेक्षित नव्हतं. पण ही लढाई आपण लढतोय. आपापले धार्मिक सण, उत्सव बाजूला ठेवून माणुसकीच्या धर्माला प्राधान्य दिल्याबद्दल सर्व धर्मियांचे आभार मानायला हवे. मुस्लीम धर्मियांनी आपले नमाज घरातच अदा करावेत, मस्जिद किंवा रस्त्यावर नमाज पठण करण्यासाठी गर्दी करू नका. जे संयम पाळताय त्यातच देव आहे. आपल्यासाठी अहोरात्र झटणारे जे कुणी आहेत, त्यांच्यात देव आहे. डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कामगार आणि पोलिसांमध्ये देव आहे. आपल्या सेवेसाठी झटणाऱ्यांचा आदर करणे गरजेचे आहे. तसेच जनतेशी संवाद साधताना लॉकडाऊन पाळणाऱ्या जनतेचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. लॉकडाऊनमुळे आपण कोरोनाचा गुणाकार रोखू शकलो, असे उद्धव यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी केंद्रीय मंत्री गडकरींचे आभार मानले. कारण, प्रसारमाध्यमांशी बोलताना गडकरी म्हणाले होते की, मी या परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवत आहे. केंद्रात आणि राज्यात एकोपा असताना काही जण अजूनही राजकारण करत आहेत. राज्यात काही विरोधकांनी मुख्यमंत्रीपदावरून राजकारण करत राज्याचे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला होता. गडकरींनी विरोधकांचे कान टोचले हे बरे झाले. केंद्राचे पथक मुंबईत मुक्कामी असून केंद्राच्या पथकाकडे त्रयस्थपणे निरीक्षण करण्याची विनंतीहि मुख्यमंत्र्यानी केली आहे. नागरिकांनी कोरणाची लक्षणे दिसताच लवकरात लवकर दवाखान्यात दाखल व्हावे, असे आवाहनही उद्धव यांनी केले.कापूस खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्यात आली आहे. फळफळावळ विक्रीवर बंधन नाहीत. काही जिल्ह्यांमध्ये काही उद्योगांना परवानगी दिली आहे. हे संकट पूर्ण दुर्लक्षित न करता हळू हळू पूर्वपदाच्या दिशेने आपण पावले टाकत असल्याची कल्पना मुख्यमंत्र्यानी जनतेला दिली. कोरोनावर औषध येण्याधीच आपला देश आत्मविश्वास आणि संयमाच्या बळावर हे युद्ध जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.                                                             राज्यात करोनाच्या विषाणूमुळे बिकट परिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु हेत. मात्र, करोनासंदर्भात निर्णय घेण्यात सरकार अपयशी ठरल्याची तसेच रेशनच्या धान्य वाटपावरून राज्य सरकारवर विरोधक टीका करीत आहेत. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता समाचार घेतला. महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून लॉकडाउनमुळे या संकटावर मात करण्यात आपण काही प्रमाणात यशस्वी ठरलो आहोत. आरोग्य कर्मचारी, पोलीस हे लोक खूपच तणावाखाली काम करीत आहेत, असेही मुख्यमंत्र्यानी म्हटले आहे. सध्या केंद्रातील पथक राज्यातील करोनाविषयीक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्यात आलेलं आहे. केंद्राचे पथक पाच सहा दिवसांपासून मुंबई, पुण्यात आले आहे. राज्यात अन्न सुरक्षा योजनेतंर्गत धान्य वाटायचे असून त्यात फक्त तांदूळ आहे. राज्याला गहू आणि डाळ हवी आहे. केंद्र सरकारकडून हे मिळणे आवश्यक आहे. नंतरच दाल मे कुछ काला है, हे पाहता येईल असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला दिला. मुख्यमंत्र्यांना विरोध करणाऱ्या चमको विरोधकांनी राज्य सरकारला सहकार्य केले ते महाराष्ट्रातीळ नागरिक कोरोनाच्या परिस्थितीवर सहज मात करतील. परंतु राजकारण बाजूला ठेवून कोरोनाशी लढण्यासाठी विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही,हाच यातील महत्वाचा मुद्दा आहे.