तीन सख्या बहिणींच्या दुर्दैवी मृत्यूने सैदापूर हादरले

शहरालगतच्या सैदापूर ता. कराड येथे एकाच कूटूंबातील तीन सख्या बहिणींचा आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी 17 रोजी मध्यरात्री तीन मुलींसह त्यांच्या आईस उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना उपचारासाठी तात्काळ कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यातील दोन मुलींचा मृत्यू झाला. तर आज (शुक्रवारी 18 रोजी) सकाळी उपचार सुरु असतानाच तिसऱ्या मुलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सैदापूर हादारले आहे.

तीन सख्या बहिणींच्या दुर्दैवी मृत्यूने सैदापूर हादरले

तीन सख्या बहिणींच्या दुर्दैवी मृत्यूने सैदापूर हादरले 

घातपाताचा संशय : पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद, कराड व परिसरातील खून, मृत्यूचे सत्र संपता संपेना

कराड/प्रतिनीधी :
         शहरालगतच्या सैदापूर ता. कराड येथे एकाच कूटूंबातील तीन सख्या बहिणींचा आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी 17 रोजी मध्यरात्री तीन मुलींसह त्यांच्या आईस उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना उपचारासाठी तात्काळ कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यातील दोन मुलींचा मृत्यू झाला. तर आज (शुक्रवारी 18 रोजी) सकाळी उपचार सुरु असतानाच तिसऱ्या मुलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सैदापूर हादारले आहे.
          आस्था (वय 9), आयुशी (वय 3),  आरुषी  (वय 8) रा. मिल्ट्री वस्तीगृहती शेजारी, सैदापूर ता. कराड असे मृत्यू झालेल्या तीन चिमूकल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. परंतु, या प्रकरणात घातपाताचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. कराड व परिसरात खूनाचे सत्र सुरू असतानाच सैदापूरमध्ये एकाच कूटूंबातील चिमुकल्या तीन सख्या बहिणींच्या आकस्मिक दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
           याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सैदापूर येथे शिवानंद सासवे हे येथील मिल्ट्री वस्तीगृह शेजारी आपल्या कूटूंबासह वास्तव्यास आहेत. गूरूवारी 17 रोजी सायंकाळी कुटुंबातील सर्वांनी एकत्रित जेवण केले. परंतु, मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास शिवानंद यांची पत्नी आणि त्यांच्या मुली आरुषी, आस्था व आयुषी यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी मलकापूर येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 
          मात्र, उपचारादरम्यान, आस्था व आयुषी यांचा मृत्यू झाला. तर आरुषीवर हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. यामध्ये तिच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा होत असतानाच आज (शुक्रवारी 18 रोजी) सकाळी तिचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या मुलींच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेतील मृत मुलींचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलिसांनी तपासास गती दिली आहे.