ऊसदर प्रश्नी संयुक्तिक बैठक बोलवा - बळीराजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

ऊसदर प्रश्नी संयुक्तिक बैठक बोलवा - बळीराजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बळीराजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन :  

कराड/प्रतिनिधी :

                       सध्या अनेक साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगाम सुरु करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी अध्यापि एफआरपी अधिक साडेतीनशे  रुपये चालू गळीत हंगामासाठी ऊसदर जाहीर केलेला नाही. यासाठी साखर कारखानदार व सर्व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख अधिकाऱ्यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात यावी, यासाठी बुधवारी 20 रोजी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले.

                   यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्लाजिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळीसातारा तालुका युवाध्यक्ष किरण गोडसे, कोरेगाव तालुका अध्यक्ष संजय घाडगे, संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते