उच्च शिक्षणाला चालना देणारा अर्थसंकल्प- कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे

उच्च शिक्षणाला चालना देणारा अर्थसंकल्प- कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे


केंद्र सरकारच्या सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पात नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे अंमलात आणण्याचा संकल्प करण्यात आला आहे. उच्च शिक्षण आयोगाची स्थापना, नॅशनल रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून संशोधनासाठी पायाभूत व भौतिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ४०० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. तसेच भारतात शिक्षणासाठी विदेशातून विद्यार्थी यावेत, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जगातील टॉप २०० विद्यापीठात भारतीय विद्यापीठ, आयआयटी, आयआयएस‘ सारख्या संस्था याव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचा संकल्प करण्यात आला आहे. एकंदरीत जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या प्रगतीचा ‘रोड मॅप‘ दर्शविणारा, उच्च शिक्षणाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे.
                            - डॉ. देवानंद शिंदे
                    कुलगुरु, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर