उदयनराजे भोसले, अतुल भोसलेंना जाहीर पाठिंबा - राजेंद्रसिंह यादव

उदयनराजे भोसले, अतुल भोसलेंना जाहीर पाठिंबा - राजेंद्रसिंह यादव

कराड/प्रतिनिधी : 
                        कराड येथे महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तेव्हा कराडच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. तसेच सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून, शहर व परिसराचा विकास डोळ्यासमोर ठेवून झालेल्या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे उदयनराजे भोसले आणि डॉ. अतुल भोसले यांना लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा देणार असल्याचे माहिती माजी उपनगराध्यक्ष व यशवंत जनशक्ती आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिली. 
                          यावेळी भाजपचे सरचिटणीस डॉ. अतुल भोसले, नगरसेवक हणमंतराव जाधव, विजयी वाटेगावकर, अतुल शिंदे, नगरसेविका स्मिता हुलवान, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
                       

जिकडे आम्ही तिकडे गुलाल

गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य जनतेसाठी व सामाजिक कार्यासाठी आमचा मोठा सहभाग राहिला. तसेच येत्या काळात शहर व परिसरात कृष्णा-,कोयनेसारखी विकासाचीही गंगा वाहती करण्याचा आमचा मानस आहे. नगरपालिकेसह लोकसभा, विधानसभा व अन्य निवडणुकीतही नेहमीच आमची भूमिका निर्णायक ठरली असून आम्ही जिकडे जाऊ तिकडे गुलाल असे समीकरण निर्माण झाले असल्याचे मत राजेंद्रसिंह यादव यांनी यावेळी व्यक्त केले.