प्रीतिसंगम इफेक्ट : उंब्रज बाजारपेठ बंद उपाययोजना चालू

दै प्रीतिसंगम ने "उंब्रज ग्रामपंचायत बाजारा बाबत निष्काळजी"ही बातमी ऑनलाईन ला प्रसिद्ध करताच उंब्रज ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले असून गट विकास अधिकारी यांनी तातडीने उंब्रज बाजारपेठेतील परिस्थितीचा आढावा घेऊन तात्काळ बाजारपेठ रिकामी केली.

प्रीतिसंगम इफेक्ट : उंब्रज बाजारपेठ बंद उपाययोजना चालू
दैनिक प्रीतिसंगममधील बातमीची दखल घेत उंब्रज बाजार बंद करण्यात आला.

गटविकास अधिकारी यांची उंब्रजला तातडीची भेट

उंब्रज/अनिल कदम

दै प्रीतिसंगम ने "उंब्रज ग्रामपंचायत बाजारा बाबत निष्काळजी"ही बातमी ऑनलाईन ला प्रसिद्ध करताच उंब्रज ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले असून गट विकास अधिकारी यांनी तातडीने उंब्रज बाजारपेठेतील परिस्थितीचा आढावा घेऊन तात्काळ बाजारपेठ रिकामी केली.यानंतर चौकोणाचे मार्किंग आणि इतर सूचना केल्या यावेळी उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि अजय गोरड आणि ग्रामसेवक व्ही एम चव्हाण उपस्थित होते.

उंब्रज बाजारपेठेत गुरुवारी सकाळी झालेली गर्दी सर्वांच्याच उरात धडकी भरवणारी होती. जनता एवढी निष्काळजी असू शकते याबाबत लोकांच्यात उलटसुलट चर्चा चालू होती कोरोना आजाराचे संकट देशावर घोंघावत  असताना लोक बिनधास्त गर्दी करून बाजारपेठेत रस्त्यावर आल्याने उंब्रजकर आजाराला तर निमंत्रण देत नाहीत ना ? अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

कोरोना आजाराबाबत उंब्रज ग्रामपंचायत अजूनतरी सायलंट मोडवर असून वेळ गेल्यावर ऍक्टिव्ह होऊन काहीही उपयोग होणार नसल्याचे मत व्यक्त होत आहे.अजूनही वेळ गेलेली नाही ग्रामपंचायत प्रशासनाने युद्ध पातळीवर मोहीम हातात घेऊन मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे