उंब्रजमध्ये कडकडीत बंद

उंब्रजमध्ये कडकडीत बंद
उंब्रजमध्ये कडकडीत बंद

उंब्रज/प्रतिनिधी :
                      राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव ईडीच्या आरोपपत्रात आल्याचा पार्श्वभूमीवर उंब्रज मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिबा दर्शवित कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी व्यवसायिक यांनी स्वस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी झाल्याने उंब्रज सह परीसरात शुकशुकाट जाणवत होता.
                      उंब्रज ता. कराड येथील बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या नजीक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एकत्रित जमा होऊन शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर आंदोलकांनी मनोगत व्यक्त करत सरकार विरोधात तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला अत्यावश्यक सेवा मेडिकल, दवाखाने, बंदमधून वगळण्यात आले होते.