काँग्रेसचा जन्म इंग्रजांना मदत करण्यासाठी झाला होता : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा

संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची

काँग्रेसचा जन्म इंग्रजांना मदत करण्यासाठी झाला होता : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा

देशातील काँग्रेसची सत्ता गेल्यामुळे हताश होऊन पंतप्रधान मोदींना शिव्या देत आहेत. काँग्रेसचा जन्म इंग्रजांना मदत करण्यासाठी झाला होता तर काँग्रेस पार्टीची निर्मिती करणारे हे इंग्रज होते. सर्वप्रथम संपूर्ण स्वतंत्र्याची मागणी प्रथम सरसंघ चालक हेडगेवारांनी केली होती.मूळ संविधानात कुठेही कलम ३७० चा उल्लेख नसून ते लावण्याचे काम काँग्रेसने केले.यामुळे आमच्या सरकारला अनेक अडचणी निर्माण झाल्या असल्याचे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी दुर्बल घटक संवाद मेळावा आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

यावेळी बोलताना मिश्रा म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने देशात अनेक स्वातंत्र्यवीर निर्माण झाले छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा व्यापक प्रभाव देशाच्या संस्कृती आणि इतिहासावर पडला आहे. दोनशे वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांनी सामाजिक विषयावर उठाव करून त्यावर समाधानकारक काम केले. स्वतंत्र्यानंतरच्या भारताची संकल्पना डॉ.भीमराव आंबेडकरांनी मांडली होती स्वातंत्र्यानंतरचे सरकार आंबेडकरांच्या विचाराचे सरकार नव्हते आंबेडकरांना निवडणुकीत हरवण्याचे काम त्यावेळीचे सरकार व पंतप्रधान यांनी केले. तसेच त्यांना सन्मान न मिळण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी दुर्बल व गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना राबवून त्यांना सक्षम बनवण्याचे काम करत आहेत. देशाला ताकदवान बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मोदींनी एक संघ भारत बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.या कार्यक्रमप्रसंगी आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले,अतुल भोसले महेशकुमार जाधव यांचेसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते