उंब्रजच्या छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा परिसर सुशोभीकरनासाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाईंचा पाठपुरावा

उंब्रजच्या छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा परिसर सुशोभीकरनासाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर

उंब्रजच्या छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा परिसर सुशोभीकरनासाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाईंचा पाठपुरावा


उंब्रज येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा परिसर सुशोभीकरनासाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन आराखडा विशेष नागरी सुविधा योजने अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विशेष प्रयत्न केले असल्याची माहिती संतोष बेडके यांनी दिली.

श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान यांचे वतीने उंब्रज बाजारपेठ मध्ये अश्वारूढ अशा सोळा फूट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सर्व शासकीय मान्यता मिळाल्या आहेत. सुमारे एक वर्षापासून या शिवस्मारकासाठी निधी संकलन चालू आहे .उंब्रज आणि परिसरातील शिवप्रेमीनी आज अखेर सुमारे दहा लाख रुपयांच्या आसपास निधी जमा केला आहे,उर्वरित निधीसाठी सर्वोपरी प्रयत्न चालू असल्याची माहिती यावेळी संतोष बेडके यांनी दिली  

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांचेकडे निधीसाठी मागणी केली होती,मंजुरीसाठीच्या सर्व प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी ही वेळोवेळी बहुमोल  सहकार्य केले आहे. श्री शिव योद्धा प्रतिष्ठानने निधीसाठी केलेला पाठपुरावा यांची दखल घेऊन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी  छत्रपती शिवाजी महाराज  पुतळा परिसर सुशोभिकरनासाठी पंचवीस लाख रु चा निधी मंजूर केला आहे.

 

श्री शिव योद्धा प्रतिष्ठानने ५० लाखाचा आराखडा सादर केला आहे.कमी पडलेला उर्वरीत निधीही देण्याचे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले आहे. तसेच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोळा फूट उंच पंचधातूच्या मूर्तीसाठी लोकसहभागातून निधी संकलन करायचे काम सुरु आहे.लवकरच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते भूमीपूजनाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे.

उंब्रज बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी होत असलेल्या या शिवकार्याला केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार तसेच ग्रामपंचायत उंब्रज  व श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानने केलेला पाठपुरावा याचे उंब्रज व परिसर ग्रामस्थातून कौतुक होत आहे.तसेच भव्य व दिव्य अशा शिवकार्याला उंब्रज व परिसरातील ग्रामस्थांचे व  शिवप्रेमींचे होत असलेल्या सरक
सहकार्या बद्दलही प्रतिष्ठानने आभार व्यक्त केले.