सोयाबीन व्यापारी तुपाशी पण शेतकरी मात्र उपाशी : कॉम्रेड सयाजीराव पाटील

सोयाबीन व्यापारी तुपाशी पण शेतकरी मात्र उपाशी : कॉम्रेड सयाजीराव पाटील

सोयाबीन व्यापारी तुपाशी पण शेतकरी मात्र उपाशी : कॉम्रेड सयाजीराव पाटील

उंब्रज/प्रतिनिधी

सोयाबीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारामध्ये शेतीमाल खरेदी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अमर्याद लुट व फसवणूक होत आहे. व्यापाऱ्यांकडून वजनमापात पाप केले जाते तसेच वेगवेगळ्या सबबी सांगून माँयशर,आद्रता, बारदान वजन, सोयाबीनच्या दर्जा बाबत काहीतरी सबबी सांगून शेतकऱ्यांना मिळणारी त्यांच्या उत्पादनाची योग्य किमंत व्यापाऱ्यांकडून दिली जात नाही. फसवणूकीतून शेतकऱ्यांची होणारी अमर्याद लुट थांबवण्यासाठी शासणाने कठोर पावले उचलावीत यासंदर्भात शहिदे आझम भगतसिंग प्रतिष्ठानच्या वतीने आखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष काँम्रेड सयाजीराव पाटील यांनी, काँ दिपक जाधव यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.


याबाबत निवेदनात म्हटले आहे की,अलीकडच्या काळात फक्त अन्नधान्य पिकवण्याच्या पारंपारिक शेतीपद्धतीतून काहीसे बाजूला होऊन फळांची तसेच ज्याला Money crops म्हणता येईल अशी पीके शेतकरी वर्ग पिकवत आहे. ही अत्यंत स्वागताई घटना आहे. या ओघातच आपल्याकडे
सोयाबीन मोठ्या प्रमाणात शेतकरी घेऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा  होताना दिसत आहे. परंतु या सोयाबीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारामध्ये शेतीमाल खरेदी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अमर्याद लुट व फसवणूक होताना दिसत आहे. अनेक शेतकरी कार्यकर्त्यांशी, चर्चा करताना व्यापाऱ्यांकडून वजनमापात कसे पाप केले जात आहे त्यासंबंधी वेगवेगळ्या सबबी सांगून, खोटी कारणे देऊन शेतकऱ्यांची कशी फसवणूक केली जात आहे.  हे वारंवार चर्चेतून स्पष्ट होत आहे. सोयाबीनची खरेदी करताना Moisture,आद्रता, बारदान वजन, सोयाबीनच्या दर्जा बाबत काहीतरी सबबी सांगून शेतकऱ्यांना मिळणारी त्यांच्या उत्पादनाची योग्य किमंत व्यापाऱ्यांकडून दिली जात नाही. फसवणूकीतून शेतकऱ्यांची होणारी लुट अमर्याद प्रमाणात होत आहे.

 

याप्रकाराने भगतसिंग प्रतिष्ठानचे व किसान सभेचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी व्यापाऱ्यांकडून होणारे हे गैरप्रकार थांबलेच पाहिजेत म्हणून शासकीय अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी व त्यांनी कायद्यानुसार आपल्या अधिकारांचा वापर करून व्यापाऱ्यांना तंबी द्यावी,शेतकऱ्यांची फसवणूक न करण्याबाबत सक्त ताकीद द्यावी अशा उद्देशाने भगतसिंग प्रतिष्ठानच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी  जिल्हाधिकारी, सातारा यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्य अधिकारी यांच्याकडे यासंदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन जिल्ह्यातील सर्व संबंधातील अधिकाऱ्यांना पाठवून देण्याचे व योग्य ती कारवाई होईल असे सांगितले. तसेच शेतीमाल खरेदी व्यापाऱ्यांवर जे प्रत्यक्ष बाजार समित्यांमार्फत कारवाईचे आदेश देऊ शकतात अशा सातारा जिल्हा मुख्य कृषी अधिकारी यांच्याकडेही निवेदन देण्यात आले. त्यांनी जिल्ह्यातील त्यांच्या सर्व तालुका अधिकाऱ्यांना व बाजार समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आमचे निवेदन पाठवून देऊन या व्यापारांतील खरेदीदरांचा, व्यापाऱ्यांचा कठोर बंदोबस्त केला जाईल असे आश्वासन दिले.