चौडेश्वरी गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम- डॉ.संजय कुंभार

चौडेश्वरी गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम- डॉ.संजय कुंभार
उंब्रजः येथे चौडेश्वरी गणेश मंडळाच्या वतीने कोरोना योध्दांना वाफरा मशीन वाटप करताना विजय कुरकूटे, विवेक लाटे,सपोनि अजय गोरड, डॉ. संजय कुंभार, डॉ. सुनील कोडगुले, डॉ. वसंतराव मिसाळ व इतर
चौडेश्वरी गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम- डॉ.संजय कुंभार

चौडेश्वरी गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम- डॉ.संजय कुंभार

परिसरातील मंडळांनी यापासून प्रेरणा घ्यावी

प्रतिनिधी/उंब्रज

कोरोना महामारीच्या संकट काळात उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत,साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करीत चौंडेश्वरी गणेश मंडळाच्या वतीने वाफारा मशीन वाटपाचा कार्यक्रम उंब्रज पोलीस ठाण्यात संपन्न झाला.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज यांना ५० वाफारा मशीन तर फिल्डवर काम करणाऱ्या व्यक्तींना ६३ वाफारा मशीन तसेच पत्रकार,मंडळाचे सभासद यांना प्रातिनिधिक स्वरूपात वाफारा मशीनचे वाटप करण्यात आले.मंडळाच्या या स्तुत्य आणि लोकोपयोगी उपक्रमाचे उंब्रज परिसरातून स्वागत करण्यात येत आहे.

या वर्षी जगणे महत्वाचे आहे,कोरोनाबधित रुग्णांची संख्या रोज ४०० च्या आसपास येत आहे.स्थानिक लोकांपासून कोरोना संक्रमण वाढू लागले आहे,सर्वजण कोरोनाशी दोन हात करून लढा देत आहेत.उंब्रज परिसरात रुग्ण संख्या आटोक्यात आहे.जिल्ह्याच्या इतर भागाच्या तुलनेत उंब्रजची अवस्था अतिशय चांगली आहे.संकट काळात पारंपरिक गणेशोत्सवाला बगल देवून चौडेश्वरी गणेश मंडळाने कोरोना संकट काळात केलेली मदत लाख मोलाची आहे. या मंडळाचा आदर्श पंचक्रोशीतील मंडळानी घेवून सहकार्य केल्यास समाजातील कोरोना बाधित व महामारीमुळे संकटात आलेल्या नागरिकांना मदत होईल. उंब्रजमध्ये प्लाजमासाठी रक्तदान शिबीरे, रुग्णवाहिका उपलब्ध करणे,  उपयुक्त औषधे  वाटप करण्यात यावे तसेच चौडेश्वरी गणेश मंडळांचा आदर्श  इतरांनी घेऊन  या पध्दतीने  मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन डॉ. संजय कुंभार यांनी केले. 

पोलीस प्रशासनाने  सार्वजनिक मंडळांना केलेल्या आवाहनाला उंब्रज ता.कराड येथील चौडेश्वरी गणेश मंडळाने प्रतिसाद दिला असुन या मंडळाने इतर खर्चाला बगल देवून त्यातून वाफारा मशीन खरेदी केल्या असुन मंगळवारी उंब्रज पोलीस ठाण्यात कोरोना काळात. सक्रीय काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी, आरोग्य विभाग, गावोगावी काम करणारे कोरोना योध्दे यांना वाफरा मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक अजय गोरड वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार,डॉ. सुनील कोडगुले, डॉ. वसंतराव मिसाळ, चौडेश्वरी मंडळाचे कार्यवाहक विजय कुरकूटे, विवेक लाटे उपस्थित होते.

सपोनि अजय गोरड म्हणाले, कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होवू लागल्याने यावर्षी गणेश मंडळानी साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले होते त्यास उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुतांश मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोरोना महामारीत समाजाला कशा प्रकारे मदत करता येईल यासाठी दक्ष राहवे असे आवाहन त्यांनी केले. 

डॉ सुनील कोडगुले म्हणाले, कोरोनाने भयावह रुप धारण केले आहे. आता  स्थानिक लोकांपासून संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे प्रत्येकाने  काळजी घेतली पाहिजे. रुग्ण संख्या वाढल्याने बहुतांश हाँस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नाही. प्रत्येकाने आपल्यासह कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.यावेळी चौडेश्वरी गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश गोरे, उपाध्यक्ष निशांत तारळेकर ,विपुल दुधाणे उमेश बाबर, रोहन कुरकुटे,अभि पाखले, गोंविद दुधाणे,  सुनील वाडकर शांताराम भागवत उपस्थित होते.

 

रेमडिसेव्हर इंजेक्शन व प्लाझ्मा साठी पुढाकार घ्यावा.

डॉ.सुनील कोडगुले व डॉ.संजय कुंभार यांनी यावेळी कोविड १९ बाबत सर्वच गणेश मंडळांनी रेमडिसेव्हर इंजेक्शन साठी मदत गोळा करून गोरगरीब रुग्णांना गरजेच्या वेळी उपयोगी येईल असा कोविड निधी जमा करता आला तर समाजातील गोर गरीब जनतेला त्याचा उपयोग होईल असे आवाहन केले ,तसेच डॉ. संजय कुंभार यांनी सांगितले की उंब्रज परिसरात १६३ रुग्ण कोरोनाबधित आहेत यापैकी काहीजण सध्या उपचार घेत आहेत परंतु बरे झालेल्या रुग्णांनी रक्तदान केल्यास मोठ्या प्रमाणावर प्लाझ्मा मिळून गरजू रुग्णांचे प्राण वाचवता येतील.