निष्क्रिय ग्रामसेवकाला गटविकास अधिकाऱ्यांची साथ...!

पिण्याच्या पाण्यासह अन्य समस्यांचे तक्रारदार महिलांचे गाऱ्हाणे ; दोन तास ताटकळत 

निष्क्रिय ग्रामसेवकाला गटविकास अधिकाऱ्यांची साथ...!

उंब्रजच्या महिलांना  गटविकास अधिकाऱ्यांनी भेटने टाळले 

पिण्याच्या पाण्यासह अन्य समस्यांचे गर्हाणे ; दोन तास ताटकळत 

उंब्रज/प्रतिनिधी


उंब्रज ता.कराड येथील वार्ड क्रमांक ६ मधील छत्रपती संभाजी राजे चौक येथील नागरी वसाहतीत कित्येक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट यासह अन्य समस्यांचा पाढा वाचायला आलेल्या महिलांना दोन तास ताटकळत ठेवून म्हणणे ऐकून न घेता गटविकास अधिकाऱ्यांनी  महिलांची भेट घेणे टाळल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले.

येथील वार्ड क्रमांक ६ मधील छत्रपती संभाजी राजे चौक येथील नागरी वसाहतीत गेले कित्येक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट झाला असून अन्य समस्यांच्या निवारणासाठी वसाहतीमधील महिलांसह नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते.या समस्यांबाबत प्रसिद्धी माध्यमांनी आवाज ही उठवला.

दरम्यान बुधवार दि.९ रोजी गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार हे एका बैठकीनिमित्त उंब्रज ग्रामपंचायत येथे आल्याचे वार्ड क्र. ६ मधील महिलांना समजल्यानंतर हातातील सर्व काम सोडून सुमारे २० ते २५ महिलांनी  उंब्रज ग्रामपंचायतीत धाव घेतली.यावेळी महिलांच्या आगमनाने भंबेरी उडालेल्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या कर्मचारी व गटविकास अधिकाऱ्यांनी महिलांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी टाळाटाळ केली असल्याची माहिती महिलांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. 

ग्रामपंचायत इमारतीत सुमारे २ तास भेट घेण्यासाठी ताटकळत उभ्या असलेल्या महिलांना गटविकास अधिकारी यांनी भेटने टाळले.यामुळे महिलांच्यात संताप निर्माण झाला.नागरी वसाहतीमधील समस्या मांडण्यासाठी आलेल्या महिलांना ग्रामविकास अधिकार्यांनी साहेब मिटिंगमध्ये आहेत त्यांना अजून वेळ लागेल अशी थातुरमातुर उत्तरे व आश्र्वासने देऊन घरचा रस्ता दाखवला.मी बघायला येतो अशी आश्र्वासने देत महिलांना जाण्याचा सल्ला दिला.यावेळी समस्या मांडण्यासाठी आलेल्या महिलांनी पिण्याच्या पाणी यासह अन्य समस्यांचे निवारण तत्काळ न झाल्यास 
हांडा मोर्चा काढणार असल्याचे महिलांनी सांगितले.

 

साहेबांनी भेट घेणे टाळले

आमच्या समस्यांचे लेखी निवेदन ग्रामपंचायतीला आठ दिवसांपूर्वी दिले आहे.गेल्या महिन्याभरापासून पिण्याचे पाणी नाही त्यामुळे आमचे हाल होत आहेत.यासह कचरा,गटारे साफसफाई यांची सफाई कधी होणार विचारले असता, लवकरच करू असे सांगितले जात आहे.मात्र अद्याप कसलीही कार्यवाही केली नाही.आमची दखल कोणी तरी घ्यावी म्हणून आज आम्ही सर्व महिला मोठ्या साहेबांना भेटायला आलो होतो.मात्र, साहेबांनी आमची भेट घेणे टाळले. 

एक त्रस्त महिला ग्रामस्थ