जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची उंब्रजला झाडाझडती

प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली भेट,सखोल चौकशी होणार

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची उंब्रजला झाडाझडती

उंब्रज/प्रतिनिधी

उंब्रज ता.कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत असणारी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पैसे घेऊन केली जात असल्याने गोरगरीब कुटुंब हवालदिल झाले आहेत या प्रीतिसंगम ऑनलाईन वर प्रसिध्द झालेल्या बातमीची दखल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार यांनी तात्काळ घेतली असून शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती दिली आहे. याबाबत दै प्रीतिसंगमने वस्तुस्थिती समोर आणताना गोरगरीब रुग्णांची होणारी ससेहोलपट समोर आणली याबाबत अभिनंदन केले असून संबधित प्रकरणाबाबत गुरुवार दि.९ रोजी सकाळपासून उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व नर्सेस तसेच स्टाफची झाडाझडती सुरू होती.


 उंब्रजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गोरगरीब रुग्णांचे पैसे घेतले जातात बुधवार दि.८ रोजी सुमारे ३५ कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया पार पडल्या असून प्रत्येकी काहीतरी रक्कम विनाकारण लाटली असल्याने महिन्यातील वरकमाई किती मोठी असणार याबाबत अंदाज केला असता संबंधित प्रकरणाशी दोशी आढणाऱ्या व्यक्तीवर कठोर कायदेशीर व्हावी अशी मागणी गोरगरीब नागरिकांच्यातून होऊ लागली होती.याबाबत डॉ.पवार यांनी खोलात जाऊन चौकशी केली असता यामध्ये २१ हजार रुपये शस्त्रक्रिया शुल्क म्हणून घेतले असल्याची माहिती दिली.तर संबधित डॉक्टर सदरचे पैसे गुरुवारी सायंकाळपर्यत शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबाना देण्यासाठी उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवुन देणार असल्याची माहिती दिली आहे.

घटना खरी आहे

संबधित घटनेबाबत उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता प्रीतिसंगम ऑनलाइनला प्रसारित झालेल्या बातमीत तथ्य असून २१ हजार रुपये शुल्क घेतले असल्याची माहिती मिळाली आहे यामुळे उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात पैसे घेतले हा अतिशय गंभीर प्रकार असून याबाबत संबंधितांवर चौकशी होऊन योग्य ती कारवाई केली जाईल

डॉ.राधाकृष्ण पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी