उंब्रज ग्रामपंचायत बाजाराबाबत निष्क्रीय

कोणत्याही शेतकरी व्यापाऱ्यांना पांढरा चौकोन अथवा गोल आखून दिला नसल्याने कोरोनाबाबत ग्रामपंचायत निष्काळजी असल्याची जाणवत आहे.बाजारात होणारी गर्दी ही निष्काळजीपणाची लक्षणे आहेत.

उंब्रज ग्रामपंचायत बाजाराबाबत निष्क्रीय
उंब्रज बाजार

पोलिसांच्या नियमावलीला केराची टोपली

उंब्रज/प्रतिनिधी

गुरुवार दि.२६ पासून नियमित बाजार भरणार असून गर्दी न करण्यासाठी काही नियमावली उंब्रज पोलिसांनी जाहीर केली होती. यामध्ये पांढरा चौकोन आखून ठराविक अंतर राखण्याचे सूचित केले होते. परंतु ग्रामपंचायतच कोरोनामुळे घाबरलेली असल्याने."दुरून डोंगर साजरे"अशी भूमिका घेतली आहे.कोणत्याही शेतकरी व्यापाऱ्यांना पांढरा चौकोन अथवा गोल आखून दिला नसल्याने कोरोनाबाबत ग्रामपंचायत निष्काळजी असल्याची जाणवत आहे.बाजारात होणारी गर्दी ही निष्काळजीपणाची लक्षणे आहेत.