उंब्रज ग्रामपंचायतीला आतातरी जाग येणार का ?

जंतुनाशक फवारणी व प्राथमिक उपाययोजनांची फरफट

उंब्रज ग्रामपंचायतीला आतातरी जाग येणार का ?

उंब्रज/प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात कोरोना महामारीचा उद्रेक व्हायला सुरुवात झाली आहे.उंब्रज परिसरातील गेल्या दोन दिवसात दोन नागरिक कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यातील एका वयोवृद्ध नागरिकाचा  मृत्यू झाला आहे.दोन्ही बाधित रुग्ण दाट लोकवस्तीच्या ठिकानातील आहेत.यामुळे धोका वाढला असुन त्यांचे संपर्क शोधणे जिकरीचे काम आहे.यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने 'बघ्याची भूमिका'गुंडाळून कार्यरत होण्याची गरज असल्याचे मत उंब्रज ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

जंतुनाशक फवारणी बाबत उंब्रज ग्रामपंचायत कमालीची चालढकल करीत असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करित आहेत.गत पाच वर्षात कोर्टाच्या फेऱ्यात अडकलेली  ग्रामपंचायतीची 'बॉडी व पदाधिकारी'यांची साखळी मुदत संपत आली तरी 'तारीख पे तारीख'करत असून उंब्रज ग्रामस्थ मूलभूत सोयीसुविधा यांचे पासून 'वंचित' राहत आहेत. 

उंब्रजचे ग्रामविकास अधिकारी यांनी कोरोनाच्या तोंडावर पदभार स्वीकारला असल्याने त्यांचा जास्तीत जास्त भर 'होम क्वारंटाईन'होण्याकडे असल्याची चर्चा लोकांच्यात आहे.रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कर्मचाऱ्यांची पळापळ होत आहे.पदाधिकारी मात्र निर्धास्त असून सर्व कारभार 'रामभरोसे'सोडला असल्याने ग्रामस्थ मात्र चिंतीत आहेत.सध्या परिस्थिती बदलली असून मुबंई पुणे कनेक्शन कालबाह्य झाले असून गावातील कोणीही कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढण्यापूर्वी हातपाय हलवणे गरजेचे असून बैल गेल्यावर झोपा करण्यात काहीच अर्थ नसल्याची चर्चा आहे.

धरलं तर चावतय......

उंब्रजचे ग्रामविकास अधिकारी यांची अवस्था 'धरलं तर चावतय सोडलं तर पळतय'अशी झाली आहे.ताळमेळ घालण्यातच त्यांचा वेळ जात असल्याची चर्चा ग्रामपंचायत प्रशासनात आहे.काय उपाययोजना अंमलात आणायच्या याबाबत अनेक 'तज्ञ' मंडळी 'बॉडीत' असल्यातरी एकमत होणे फार महत्त्वाचे आहे.आणि नेमक्या याच ठिकाणी 'आण्णासाहेब' कमी पडत असल्याची खसखस पिकली  आहे.प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांने गावगाडा चालवताना अतिशय कल्पकतेने निर्णय घ्यावे लागतात, परंतु कराड तालुक्याचा अनुभव यायला आण्णासाहेबांना अजून वेळ लागेल अशी कुजबुज आहे.
---------------


चार ते पाच जंतुनाशक फवारण्या केल्या

२३ मार्च ते २४ जुलै पर्यत उंब्रज मधील सर्वच वार्डात चार ते पाच जंतुनाशक फवारण्या झाल्या आहेत.तसेच ४५०० कुटुंबाना आर्सेनिक अल्बम गोळ्या व सॅनिटायजर वाटप केले आहे.ग्रामपंचायत हद्दीतील सर्वच आशा सेविका व अंगणवाडी सेविकांना मास्क व सॅनिटायजर वाटप केले आहे.हद्दीतील कोणत्याही नागरिकांची तक्रार आली असता त्याचे निवारण करण्याकडे प्रामुख्याने भर दिला जात आहे.

व्ही एम चव्हाण
ग्रामविकास अधिकारी उंब्रज
--------------

 

नागरिकांनी काळजी घ्यावी

मार्च ते जुलैच्या मध्यापर्यंत कोरोना पेंशट हे पुणे/मुंबई व बाहेर जिल्हातुन येणारे नागरिका पैकी मिळत होते परंतु सध्या काही व्यापारी/दुकानदार/येथेच राहणारे काही नागरिक कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत.त्यामुळे नागरिकांना पहिल्या पेक्षा जास्त काळजी करणे आवश्यक आहे. मास्क, शोशल डिस्टनस,सॅनिटायझर वापर करणे आवश्यक आहे.दुकानदार यांनी आपले दुकानासमोर गर्दी होणार नाही,शोशल डिस्टनस राहील यांची दक्षता घेतली पाहिजे.

अजय गोरड
सहायक पोलीस निरीक्षक
उंब्रज
--------

जनतेने सहकार्याची भावना ठेवावी

कोरोना योध्याना घरोघरी सर्वेक्षण करावे लागते.नागरिक माहिती लपवत आहेत.काही ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळत आहे.जनतेने या कोरोना योद्यांची काळजी घ्यावी व  सहकार्य करायला पाहिजे. तरच कोरोना विरुद्ध ची लढाई जिंकू आपण सर्वजण जिंकू शकू.नुकत्याच पॉझिटिव्ह आलेल्या उंब्रज मधील रुग्णांना कोरोना कसा झाला हे शोधणे अवघड असून नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे अनावश्यक कामासाठी गर्दी करणे टाळले पाहिजे आय सी एम आर चे म्हणणे आहे की हवेतून कोरोना पसरू शकतो यामुळे मास्क वापरणे बंधनकारक आहे.आणि जंतुनाशक फवारणी वारंवार होणे अत्यावश्यक आहे आणि उंब्रज सारख्या मोठया गावात फवारणी करताना शक्यतो एक किंवा दोन दिवसात फवारणी उरकने गरजेचे आहे.कारण वेळ लागला तर हवे बरोबर विषाणू पुन्हा फवारणी केलेल्या भागात पसरू शकतो.

डॉ संजय कुंभार
वैद्यकीय अधिकारी उंब्रज