ना. बाळासाहेब पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी हनुमानगाव येथे होमहवन

ना. बाळासाहेब पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी हनुमानगाव येथे होमहवन
होमहवन करताना हनुमानगावचे माजी सरपंच बाळासाहेब शिंदे व ग्रामस्थ

नामदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी हनुमानगाव येथे होमहवन

उंब्रज/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री,ना.बाळासाहेब पाटील यांना  कोरोनाची लागण झाली असल्याने काल त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले,ना.बाळासाहेब पाटील यांच्या तब्बेतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी म्हणून हनुमानगाव येथे सोशल डिस्टंसिंगचे पालन करत होमहवन करण्यात आले.ना.पाटील लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा जनसामान्य लोकांच्या सेवेत यावे असे इश्वराकडे साकडे घालण्यात आले,याप्रसंगी हनुमानगाव चे आदर्श सरपंच बाळासाहेब शिंदे सरकार, रमेश अर्जुगडे,जयसिंग धर्मे, वैभव अर्जुगडे, नवरत्न ग्रुपचे अध्यक्ष सुंशात धनवे व सर्व सदस्य, हनुमानगाव सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील व ग्रामस्थ सोशल डिस्टंसिंगचे पालन करत हजर होते.

कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व सहकार ,पणनमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कराड सह राज्यात खळबळ पसरली आहे,सर्व प्राथमिक उपाययोजनाचे तंतोतंत पालन करून सुद्धा पालकमंत्री कोरोनाबधित झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी अतिशय काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

नेहमी कार्यमग्न आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात असणारे ना.पाटील यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समजल्याने जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच ना.पाटील यांच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या कराड उत्तरच्या जनतेच्या मनात कालवाकालव होत असून ना.पाटील यांना आराम पडावा तसेच लवकर बरे वाटावे यासाठी हनुमानगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने होमहवन केले असल्याची माहिती माजी सरपंच बाळासाहेब शिंदे यांनी दै. प्रीतिसंगम बरोबर बोलताना दिली आहे.