हाँटेल वरदविनायक लाँजवर उंब्रज पोलिसांचा छापा

दरम्यान उंब्रज पोलिसांनी कारवाई दरम्यान दोन वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना ताब्यात घेवून त्यांची आशाकिरण या महीला वस्तीगृहात रवानगी केली आहे. तसेच लाँजमालक सुनिल ज्ञानदेव जाधव वय ४७  रा. हनुमानवाडी ता. कराड यास अटक  केली आहे. 

हाँटेल वरदविनायक लाँजवर उंब्रज पोलिसांचा छापा

प्रतिनिधी/उंब्रज
  उंब्रज शहरातील लाँजवर गेल्या अनेक वर्षापासून बिनबोभाट सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाला लगाम घालण्याचे आवाहन निर्माण झाले होते. गुरुवारी  उंब्रज पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करीत वेश्या व्यवसाय चालु असलेल्या हाँटेल वरदविनायक लाँजवर  छापा टाकून लाँज चालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. 


   दरम्यान उंब्रज पोलिसांनी कारवाई दरम्यान दोन वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना ताब्यात घेवून त्यांची आशाकिरण या महीला वस्तीगृहात रवानगी केली आहे. तसेच लाँजमालक सुनिल ज्ञानदेव जाधव वय ४७  रा. हनुमानवाडी ता. कराड यास अटक  केली आहे. 

 

याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सांगितले की, उंब्रज ता.कराड येथील शहरात आशियाई महामार्गालगत हाँटेल वरदविनायक लाँजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती उंब्रज पोलिसांना मिळाली होती. सदरचा लाँज मालक हा महामार्गावरील वाहतुकीच्या सोईचा गैरफायदा घेत उंब्रज शहराला वेगळे वळण लावणेच्या दृष्टीने व स्वतःचे फायद्या करीना सांगली व इतर भागातुन वेश्यांना बोलावून त्यांना मुक्कामी ठेवुन  १५०० दराने गिऱ्याईक बोलाऊन त्यातील थोडे फार पैसे वेश्यांना देवून बाकी स्वताचे फायद्या करीता वापरुन व्यवसाय करीत होता. त्यामुळे उंब्रज पोलिसांनी येथील हॉटेल वरदविनायक या लाँजवर गुरुवारी ३ रोजी दुपारी २.४५ वा. चे सुमारास बोगस गि-हाईक पाठवून उंब्रज पोलीसांनी छापा टाकला. व लाँज मालक सुनिल ज्ञानदेव जाधव रा. हनुमानवाडी ता. कराड याचेवर अटकेची कारवाई केली. तसेच दोन पिडीत वेश्या महीलांना ताब्यात घेऊन त्यांची आशाकिरण या महीला वस्तीगृहात रवानगी केली आहे.


सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल,अप्पर पोलीस अधिक्षक धिरज
पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई कराड उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक डाँ. रणजीत
पाटील यांच्या उपस्थितीत  उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, काँन्स्टेबल संजय देवकुळे, दत्तात्रय लवटे, प्रविण फडतरे, महिला पोलीस यांनी सहभाग घेतला.याबाबत  पो. कॉ. दत्तात्रय लपटे यांनी फिर्याद दिली असुन पुढील तपास सपोनि अजय गोरड हे करीत आहेत.


   दरम्यान अशा प्रकारे उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठेही  लाँज, अथवा अन्य मिळकतीमध्ये अवैद्य मार्गाने वेश्याव्यवसाय चालत असल्यास पोलिसांनी माहिती कळवावी असे आवाहन सपोनि अजय गोरड यांनी केले आहे.