उंब्रजच्या कन्या विद्यालयाची एक विद्यार्थिनी कोरोना बाधीत

व्यवस्थापनाचा शाळा बंदचा निर्णय; संपर्कातील विद्यार्थ्यांनींची होणार कोरोना टेस्ट

उंब्रजच्या कन्या विद्यालयाची एक विद्यार्थिनी कोरोना बाधीत

उंब्रजच्या कन्या विद्यालयाची एक विद्यार्थिनी कोरोना बाधीत

व्यवस्थापनाचा शाळा बंदचा निर्णय; संपर्कातील विद्यार्थ्यांनींची होणार कोरोना टेस्ट

उंब्रज / प्रतिनिधी


येथील बाजारपेठेत असणार्या रूक्मिणी पांडुरंग कदम कन्या विद्यालयातील इयत्ता १० वीच्या वर्गातील एका विद्यार्थ्यानिंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय कुंभार यांनी सांगितले असून बाधीत आलेल्या विद्यार्थ्यांनीच्या संपर्कातील विद्यार्थ्यांनींची कोरोना तपासणी केली जाणार आहे.दरम्यान,शाळा व्यवस्थापनाने पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोना बाधीत आलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनीमुळे पालकांच्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील कन्या विद्यालयात इयत्ता १० वीच्या वर्गात शिकणारी एक विद्यार्थीनी कोरोना बाधीत आली आहे.सदरची विद्यार्थ्यांनी ही तारळे येथील परिसरातील एका गावातील तिच्या नातेवाईकाचा अहवाल कोरोना बाधीत आला होता.सदर विद्यार्थ्यांनीचे शाळेतील तपासणी दरम्यान तापमान प्रमाणापेक्षा जास्त आढळून आल्याने शाळा प्रशासनाने तात्काळ सदर विद्यार्थ्यांनीची कोरोना चाचणी करण्याची सूचना केली असता उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवार दि.२७ रोजी वडील आणि तिची बहीण याची आर टी पी सी आर चाचणी केली असता यामध्ये सदरची विद्यार्थ्यांनी कोरोना बधित आली असल्याचे डॉ संजय कुंभार यांनी सांगितले.सुरक्षाविषयक म्हणून शाळा व्यवस्थापनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्याध्यापिका जंगम यांनी सांगितले आहे.अचानक शाळा बंद झाल्याने पालकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.