उंब्रजला शनिवारी आंतरराष्ट्रीय परिषद

अमेरिका व इराणचे अभ्यासक उपस्थित राहणार

उंब्रजला शनिवारी आंतरराष्ट्रीय परिषद

उंब्रज/प्रतिनिधी

        उंब्रज ता. कराड येथील रयत शिक्षण संस्थेच्या मंगलताई जगताप महिला महाविद्यालयात मराठी अन्र्थो पोलोजिकल सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने दुसरी एक दिवशी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.  शनिवारी 25 रोजी ही परिषद होणार असून या निमित्ताने देश विदेशातील अभ्यासू मान्यवर उंब्रज येथे उपस्थित राहणार आहेत.  याबाबतची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय कांबळे तसेच प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


     त्यांनी सांगितले की उंब्रजला आंतरराष्ट्रीय परिषद घेण्याचा बहुमान मिळाला आहे. उंब्रजसारख्या ग्रामीण भागात प्रथमच आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली जात आहे ही शैक्षणिक क्षेत्राच्या दृष्टीने मोठी बाब आहे. समाजशास्त्र व अंतर्गत गुणवान विभागाच्या माध्यमातून या परिषदेत राष्ट्रीयत्व, माध्यमे आणि समाज या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय परिसंवाद होणार आहे. प्राचार्य डॉ. संजय कांबळे व समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. मच्छिंद्र सकटे म्हणाले, या परिषदेस प्रमुख उद्घाटक अमेरीकेचे डॉ. मार्क लिन्डले उपस्थित राहणार आहेत तसेच यावेळी  निवृत्त उपायुक्त तानाजीराव साळुंखे, इराणचे प्रोफेसर अली बसेरी, व्हेयतनामचे ली.थी क्वाहा व अध्यक्षस्थानी द.श्री जाधव  यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.


   समारोप कार्यक्रमात माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील तसेच व्हेयतनामचे ट्रार्न न्युगाॅक ट्रंग हे प्रमुख पाहुणे तसेच  उपस्थितीत कर्नाटक युनिव्हर्सिटी धारवाडचे डॉ  टी.टी बसव गौडा, सरपंच योगराज जाधव उपस्थित राहणार आहेत.यावेळी महाविद्यालय कमिटीचे जयंत जाधव, तानाजी कदम, प्रल्हाद जाधव, दिनेश जाधव, चंद्रकांत चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीययत्व ही व्यक्तीगत भावना नाही तर ती पुर्ण समाजाची भावना असते समाजाच्या संस्कृतीचे दर्शन करत असते याचा व्यक्तीगत फायदा होवून यामुळे एकमेंकाबद्दल आदर निर्माण होतो. समाजात एकजूट निर्माण होते. त्यासाठी समाज आणि माध्यम यांचा संबंध याविषयी महत्व पुर्ण संवाद या आंतरराष्ट्रीय परिषदेत होणार आहे.