ब्रेक द चैनसाठी उंब्रज तीन दिवस पुर्णपणे बंद

ब्रेक द चैनसाठी उंब्रज तीन दिवस पुर्णपणे बंद

ब्रेक द चैनसाठी उंब्रज तीन दिवस पुर्णपणे बंद

 

प्रतिनिधी/उंब्रज

 

ब्रेक द चैनसाठी उंब्रज तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीने निवेदनाव्दारे उंब्रजसह पंचक्रोशीतील नागरिकांना आवाहन केले असून २८ ते ३० एप्रिल दरम्यान उंब्रज पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. उंब्रजसह परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चितेंचे वातावरण आहे. यासाठी ग्रामपंचायत पातळीवर विविध उपाययोजनांसह जिल्हाधिकारी यांच्या नियमांची कडक अमंलबजावणी केली जात असल्याचे सरपंच योगराज ऊर्फ माणिक जाधव यांनी सांगितले. 

 

    याबाबत अधिक माहिती अशी की, उंब्रज ग्रामपंचायतीकडून  कोरोना कलम १४४ ब्रेक द चेन अंतर्गत उंब्रज ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समिती यांनी तीन दिवसांचा कडक लाँकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार उंब्रज ग्रामपंचायत या कार्यक्षेत्रातील सर्व नागरीकांना व व्यापाऱ्यांना जाहिर आवाहन करण्यात आले असून उंब्रज येथे सद्यस्थितीत पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढत असल्याने  मंगळवार दि. २७ च्या मध्यरात्री १२.०० वाजलेपासुन ते शुक्रवार दि. ३० च्या मध्यरात्री १२ पर्यंत उंब्रज पुर्ण बंद ठेवण्यात येणार आहे.

यामधुन फक्त मेडीकल व खते दुकाने, शेती उपयोगी साहित्य दुकाने व  जिल्हाधिकारी  यांनी दिलेल्या आदेशानुसार व त्यांनी वेळेचे बंधन घालुन दिले आहे. त्यावेळेतच सुरू राहतील याची सर्व नागरीक तसेचव्यापाऱ्यानी नोंद घेवून विनाकारण गर्दी करु नये असे आवाहन केले आहे.