अट्टल दुचाकी चोरट्यास उंब्रज पोलिसांनी पकडले

अट्टल दुचाकी चोरट्यास उंब्रज पोलिसांनी पकडले
उंब्रज पोलिसांनी कोर्टी येथून दुचाकी चोरट्यास ताब्यात घेतले

अट्टल दुचाकी चोरट्यास उंब्रज पोलिसांनी पकडले


उंब्रज/प्रतिनिधी


उंब्रज पोलिसांनी दुचाकी चोरट्यास नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे.संभाजी बबन जाधव वय ३६  रा.अतित ता.जि.सातारा असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्यांच्या ताब्यातील पांढ-या रंगाची होन्डा कंपनीची अॅक्टिवा क्र.एम.एच.५० एच.२९१४ ही दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.संशयितावर यापुर्वीही वेगवेगळया पोलीस ठाण्यात मोटार सायकल चोरीबाबत गुन्हे दाखल आहेत.

 

याबाबत उंब्रज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उंब्रज ता.कराड गावचे हद्दीत गणेश तानाजी शिंदे रा.उंब्रज ता.कराड यांची पांढ-या रंगाची
होन्डा कंपनीची अॅक्टिवा क्र.एम.एच.५० एच.२९१४ ही एम इसम चोरुन नेत असले बाबत सपोनि अजय गोरड यांना फोनद्वारे नागरीकांनी कळविले.स.पो.नि.अजय गोरड यांनी पोलीस कर्मचारी आसिफ जमादार व टीम यांना सदर मोटार सायकल चोरुन नेणारे इसमांस ताब्यात घेण्याच्या सुचना केल्या.उंब्रज गावातील नांगरीकांच्या साह्याने पोलीस नाईक आसिफ जमादार यांनी  कोर्टी येथे सदर मोटारसायकल चोरुन नेणारे इसमास ताब्यात घेतले. संशयितावर यापुर्वीही वेगवेगळया पोलीस ठाणेस मोटार सायकल चोरी बाबत गुन्हे दाखल आहेत.

 

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अजय बन्सल ,अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक अजय गोरड,पोलीस नाईक आसिफ जमादार,पो.कॉ.पृथ्वीराज जाधव,पो.कॉ.श्रीधर माने यांनी केली असुन पुढील तपास पोलीस नाईक आसिफ जमादार हे करीत आहेत.