अट्टल दरोडेखोरांसह सोनाराच्या मुसक्या आवळल्या,सोनाराला मोक्का जिल्ह्यातील पहिलीच घटना

उंब्रज पोलीस,सपोनि अजय गोरड व मोक्का तपास पथकाला मोठे यश

अट्टल दरोडेखोरांसह सोनाराच्या मुसक्या आवळल्या,सोनाराला मोक्का जिल्ह्यातील पहिलीच घटना

 

उंब्रज/प्रतिनिधी :

मार्च महिन्यात मसूर ता.कराड येथे दरोडा घालणाऱ्या आंतर जिल्हा टोळी  सह दरोडेखोरांकडून सोने विकत घेणाऱ्या सोनाराविरुध्द् मोका कायद्याप्रमाणे दोषारोप पत्र पाठवण्यास अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य कायदा व सुव्यवस्था यांचेकडून अंतिम मंजुरी मिळाली असून तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील व कराड उपविभाग टीमच्या सखोल व कसोशीने केलेल्या तपास यश आले आहे. सोनाराविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई बहुदा राज्यातील पहिलीच कारवाई आहे.

 

अट्टल दरोडेखोरांसह सोनाराच्या मुसक्या आवळल्या,सोनाराला मोक्का जिल्ह्यातील पहिलीच घटना


  उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील मसूर या ठिकाणी २ मार्च २०२२ रोजी रात्री डॉक्टर संपत इराप्पा वारे यांचे बंगल्याचे दार कटवणीने आतील कडी उचकटून डॉक्टर दांपत्यास शस्त्राने जबरी मारहाण करून घरातील लोकांना जीवे मारण्याची दमदाटी देत हत्यार्याने दहशत माजवून घरातील लोकांकडून जबरीने कपाटाच्या चाव्या घेऊन व त्यांचे अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा सुमारे पाच लाख नऊ हजार पाचशे रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला होता. प्राप्त फिर्यादीवरून उंब्रज पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता.

मसुर दरोडा मोक्का गुन्हा ला अपर पोलीस महासंचालकांची मंजुरी


  जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांचे आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि अजय गोरड व पोलीस अंमलदार यांनी तपास करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सातारा यांनी निष्पन्न केलेले पाच आरोपींना त्यांनी मसूर येथील दरोड्याची कबुली दिलेले त्यांना कोर्ट मंजुरीने वर्ग करून अटक करून त्यांच्याकडून  गुन्ह्यातील गेले माला पैकी काही अंशी माल हस्तगत करून आरोपी हे टोळी करून टोळीने गुन्हे करणारे तरबेज व सराईत धाडसी व कुख्यात व सक्रिय गुन्हेगार असले बाबत निष्पन्न झालेने तसेच त्यांचे इतर साथीदार व त्यांचा चोरीचा माल घेऊन गडगंज झालेले सोनार आरोपीचे नातेवाईक यांनी गुन्ह्यातील चोरीचा माल घेऊन अप्रत्यक्षरीत्या गुण्यास व गुन्हेगारांना मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनाही सह आरोपी करण्यात आले होते.

 

तपासी अधिकारी डाॅ.रणजित पाटील Dysp कराड ,सपोनि अजय गोरड व मोक्का तपास पथकाला मोठे यश


गुन्ह्यांमधील मुख्य आरोपी कडून सोन्या-चांदीचे दागिने चोरीचे असल्याचे माहित असूनही ते बे मालूम पणे घेणारे दोघांचा समावेश आरोपीमध्ये करून संघटित गुन्हे करणाऱ्या सदर आरोपी विरुद्ध विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे मोक्या कायद्यान्वये वाढू कलमे लावण्याबाबत प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुख यांचे मार्फत पाठवून त्यास मोका लावण्याची पूर्वपरवानगी प्राप्त झाल्यानंतर पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील हे करीत होते.


गुन्ह्याच्या तपासामध्ये तपासी अधिकारी उपविभागीय अधिकारी रणजीत पाटील व तपास पथक यांनी कसोशीने तपास करून आरोपीचे गुन्ह्यांचे पूर्व रेकॉर्ड संकलित करणे आरोपींच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती संकलित करणे करार आरोपींचा शोध घेऊन त्यापैकी एका फरार आरोपीस सीताफिने अटक करून पुण्यामध्ये निष्पन्न सर्व आरोपी वृद्ध सभा व पुढे चा पुरावा गोळा करून दोषारोपपत्र मंजुरी करता महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे पाठवले होते. त्यानुसार अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांनी सराईत आरोपी १.होमराज उर्फ होम्या उद्धव काळे वय ३१ रा. वाकी शिवार ता. आष्टी जि. बीड २) अजय उर्फ आज्या सुभाष भोसले वय २३ ३. सचिन उर्फ आसी सुभाष भोसले वय २४ ४. अविनाश उर्फ अवि उर्फ महिंद्रा सुभाष भोसले वय २२ ५. रुस्तुमबाई सुभाष भोसले वय ५५ ६. सोनार निलेश संतोष पंडित सर्वजण रा. माही जळगाव ता. कर्जत जि. अहमदनगर ७. राहुल उर्फ काळया पदु भोसले वय २८, रा. वाळूज पारगाव पोस्ट पाथर्डी ता.जि. अहमदनगर ७. गणेश उर्फ बन्सी रंगीशा काळे वय रा राशीन ता. कर्जत जि. अहमदनगर त्यांचे विरुद्ध दोषारोप पाठविणेस मंजुरी दिली आहे.


सदर गुन्ह्यांमध्ये मोकाप्रमाणे तपास व दोषारोप पाठवण्यास मंजुरी मिळवण्याकरिता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार लोहिया सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल कराडचे उपविभागीय अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांनी तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील प्रवीण जाधव बी एस कांबळे पोलीस अंमलदार असिफ जमादार एस एम सपाटे एस पी साळुंखे एस पी गुरव एस एस जाधव संजय देवकुळे संदीप पवार श्रीधर माने यांनी मोका कायद्यान्वये दोषारोप पाठविण्यास मंजुरी करता व परिपूर्ण तपासा करता मेहनत घेऊन सहभाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली.