उंब्रज पोलिसांच्या कारवाईचा सलग दुसरा दिवस,१४४ दुचाकी ताब्यात

दुचाकी सोडवण्यासाठी आटापिटा

उंब्रज पोलिसांच्या कारवाईचा सलग दुसरा दिवस,१४४ दुचाकी ताब्यात

उंब्रज पोलिसांच्या कारवाईचा सलग दुसरा दिवस

दुचाकी सोडवण्यासाठी नागरिकांचा  आटापिटा

उंब्रज/प्रतिनिधी

उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दुचाकीस्वार तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा दंडुका उगारल्याने अनेकांची भंबेरी उडाली असून ७३ दुचाकी तसेच २४ विना मास्क धारकांवर कारवाई करत २०२०० रुपयांचा दंड ठोठावला आहे यामुळे पोलिसांच्या कारवाईचा चांगलाच धसका मोकाट फिरणाऱ्या दुचाकीस्वारांनी घेतला असुन दुचाकी सोडवण्यासाठी आटापिटा चालविला आहे परंतु कोरोना महामारीची लाट ओसारल्याशिवाय वाहन ताब्यात देणार नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.

सलग दुसऱ्या दिवशी उंब्रज पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत बुधवारी मोटार वाहन अंतर्गत केसेस करून ८२०० रुपरे दंड तर ७३ दुचाकी डिटेन करण्यात आल्या असून विनामास्क फिरणाऱ्या २४ ,जणांवर दंडात्मक कारवाई करून १२००० रुपये दंड वसूल केला आहे.यामुळे दोन दिवसात उंब्रज पोलिसांनी १४४ दुचाकी डिटेन केल्या असून विनामास्क फिरणाऱ्या ४५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तर ४०९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.यामुळे नागरिकांनी अनावश्यक कारणाने घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन सपोनि अजय गोरड यांनी केले असून ही दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करणार असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे अन्यथा कारवाई अटळ असल्याचे प्रीतिसंगम बरोबर बोलताना सांगितले