चंदनचोर उंब्रज पोलिसांच्या जाळ्यात

चंदनचोर उंब्रज पोलिसांच्या जाळ्यात

शामगाव ता. कराड घाटात रात्रगस्त घालणाऱ्या उंब्रज पोलीस ठाण्याच्या टीमने धडाकेबाज कारवाई करत औरंगबाद जिल्ह्यातील रेकॉर्डवरील चंदनचोर टोळीला गजाआड केले  असून त्यांच्याकडून दुचाकी व चंदन चोरीचे शस्त्र व साहित्य असा साठ  हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना दि. १६ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान सदरच्या टोळीने सातारा व पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी चंदन चोरी केली असल्याची कबुली दिली असून १)मजिदखॉ नसीबखॉ गोलवाल वय२२ रा जंजाळा ता. सिल्लोड जि. औरंगाबाद ,२) असिफखॉ नसीबखॉ जौनवाला वय १९ ,३) उजेरखॉ हुसेनखॉ जौनवाला वय१९ दोघे रा. आडगाव माहोली ता. जि. औरंगाबाद अशी संशयित आरोपींची नावे आहेत. सदर संशयीतांना न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सदर कारवाईमुळे परिसरात पुष्पा चित्रपटातील पुष्पाची चर्चा सर्वत्र सुरू होती.

 

शामगाव घाटातील उंब्रज पोलिसांची धडाकेबाज कारवाई

 

   याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.१५ सप्टेंबर रोजी करिता असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना रात्रगस्त सतर्क करणे बाबत सपोनि अजय गोरड यांनी सूचना केली होती सोळा रोजी रात्रगस्त करत असताना हेड कॉन्स्टेबल मर्ढेकर व पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पवार यांना प्राप्त माहितीनुसार एका बजाज मोटरसायकलवर तीन संशयित इसम शामगाव भागात फिरत असून ते रात्री चंदनाची झाडे हेरून कापून आतील चंदनाचे गाभ्याचा चोऱ्या करत असतात अशी माहिती मिळाली होती. हेड कॉन्स्टेबल मर्ढेकर व पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पवार व रात्रगस्त टीम शामगाव भागात पेट्रोलिंग करत असताना एक बजाज मोटर सायकल क्रमांक एम एच ११ झेड ५३९७ संशयित ट्रिपल सीट फिरताना मिळून आली सदर दुचाकीस थांबवून तपासणी केली असता गाडीवर तीन इसम आपल्या कब्जात संस्थेत साहित्य बाळगलेले स्थितीत आढळून आल्याने पोलिसांनी तीन संशयातकडे अधिक चौकशी केली असता व त्यांची झडती घेतली असता मोटर सायकल दोन करवती दोन कुऱ्हाडीची पाती असे चंदन चोरीचे साहित्य मिळून आले अधिक चौकशी केली असता सदर संशित आरोपींनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरची शस्त्र ही चंदनाची झाडे तोडून त्यातील चंदन गाभा काढण्यासाठीच बाळगल्याची कबूल दिली तसेच त्या तिघांकडे त्यांचे नाव पत्त्या बाबत खात्री केली असता ते तिघेही औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशासन त्यांचा गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता त्यांचे विरुद्ध वेदांत नगर एम सिडको उस्मानपुरा मुकुंदवाडी पुंडलिक नगर या पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती निष्पन्न झाल्याने सदरचे तिघेजण टोळीने तिच्या चोरी किंवा जबरी चोरी करण्यासाठी संघटित असल्याचे कोणत्याही भटक्या किंवा अन्य प्रकारच्या टोळी पैकी ढग किंवा दरोडेखोर असल्याचे खात्री झाल्याने त्यांचे वर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सातारा व‌ पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी चंदन चोरी केल्याचे दिली कबुली

 

   सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी मजिदखॉ  नसीबखॉ  गोलवाल,असिफखॉ नसीबखॉ जौनवाला ,उजेरखॉ हुसेनखॉ जौनवाला  यांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली व सदर गुन्ह्याचे तपासामध्ये संशयित आरोपींनी  ७५०० रूपये किंमतीचे चंदनाचे झाड खोडातील चंदनाचा गाभा काढून लपवून ठेवलेले चंदन काढून  दिले ते जप्त करण्यात आले.

औरंगाबाद ची रेकाॅर्डवरील चंदनचोर पुष्पा गॅंग गजाआड

 

    सदरची कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे उपविभागीय अधिकारी डॉक्टर रणजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मर्ढेकर पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पवार यांनी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी अजय गोरड व मसूर दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हेड  कॉन्स्टेबल  कृष्णा जाधव करीत आहेत.