सहा जणांवर तीन पानी जुगार तसेच जमावबंदी व संचारबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा उंब्रज येथील कारवाई; १८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

उंब्रज ता. कराड येथील काशिद गल्लीत एका झाडाखालील आडोशाला मोकळ्या जागेत तीन पानी जुगाराच्या डावावर उंब्रज पोलिसांनी छापा टाकून जुगाराचे साहित्यासह रोख रक्कम असा मिळून सुमारे १८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ६ जणांवर उंब्रज पोलिसांत जुगार प्रकरणी तसेच जमावबंदी व संचारबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहा जणांवर तीन पानी जुगार तसेच जमावबंदी व संचारबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा उंब्रज येथील कारवाई; १८ हजार ७२०  रुपयांचा मुद्देमाल जप्त

उंब्रज / प्रतिनिधी

उंब्रज ता. कराड येथील काशिद गल्लीत एका झाडाखालील आडोशाला मोकळ्या जागेत तीन पानी जुगाराच्या डावावर उंब्रज पोलिसांनी छापा टाकून जुगाराचे साहित्यासह रोख रक्कम असा मिळून सुमारे १८ हजार ७२०  रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ६ जणांवर उंब्रज पोलिसांत जुगार प्रकरणी तसेच जमावबंदी व संचारबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उमेश विलास घाडगे (वय३८), शेखर वसंत माने (वय३२),महेश भोलानाथ काशिद (वय३९),दिपक बबन काशिद (वय३१),सचिन प्रल्हाद वाघमारे (वय३६),दत्तात्रय बबन तवर (वय४३)सर्व रा.उंब्रज,काशिद गल्ली (काशिदवाडा) ता. कराड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
 
याबाबत पोलिसांची माहिती अशी,उंब्रज येथील काशीद गल्लीत मोकळ्या जागेत तीन पानी जुगाराचा बेकायदा बिगरपरवाना डाव चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्या अनुषंगाने उंब्रज पोलिसांच्या पथकाने सापळा रचून सदर ठिकाणी छापा टाकला असता पोलिसांना तीन पानी जुगार डावावर उमेश घाडगे,शेखर माने, महेश काशिद,दिपक काशिद,सचिन वाघमारे,दत्तात्रय तवर हे सहा जण जुगार खेळताना रंगेहाथ मिळून आले.संशियतांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जुगार साहित्य रोख रक्कम असा मिळून सुमारे १८ हजार ७२०  रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जुगार प्रकरणी तसेच जमावबंदी व संचारबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी सहा जणांवर उंब्रज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.