उंब्रज पोलीस,प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर यांचा रुग्णवाहिकेसह रूट मार्च

उंब्रज पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी,प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर तसेच स्वच्छता कर्मचारी,आशा स्वयंसेविका,आरोग्य कर्मचारी, पॅरा मेडिकल स्टाफ, नर्सेस,उंब्रज पोलीस स्टेशन ते बाजारपेठेसह सर्वच्या सर्व सहा वार्ड मधून रूट मार्च काढला होता यावेळी नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात या सर्वांना दाद देत कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी मनोबल उंचावले.

उंब्रज/प्रतिनिधी

कोरोना जागतिक महामारी च्या अनुषंगाने संपुर्ण जगामध्ये भीतीचे वातावरण आहे, टिव्ही, वृत्तपत्रातून, वॉटसअप आणि इतर सोशल मिडीया मधून  बातम्या जनतेच्या ह्रदयाची स्पंदने वाढवतात,तसेच या मोलमजुरी करणारे, हातावर पोट असणारे, छोटे मोठे व्यापारी, इ मंडळी चे  हाल होत आहेत, तरीही स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटून माणुसकीचे दर्शन दिसून येत आहे.  

स्वच्छता कर्मचारी,आशा स्वयंसेविका,आरोग्य कर्मचारी,  पॅरा मेडिकल स्टाफ, डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस कर्मचारी आणि अधिकारी, पत्रकार यांना सॅल्युट करण्यासाठी  आणि नागरीकांनी लॉकडाऊन च्या काळात दाखवलेला संयम तसेच अजून पुढे असेच सहकार्य मिळण्यासाठी एक संयुक्त बीट मार्च शुक्रवारी सकाळी पोलिस स्टेशन पासून सुरु होणार झाले, यामध्ये पोलिस कर्मचारी, पोलिस व्हॅन, अॅब्युलन्स सामील झाल्या होत्या, तोंडाला मास्क, आणि सोशल डिस्टंस, ही सर्व काळजी घेऊन जागृती मार्च निघाला होता,उंब्रज मधील नागरीकांनी  आपल्या  गॅलरी, बाल्कनीतून टाळ्या वाजवून अभिवादन केले,ग्रामस्थांनी  रस्त्यावर न येता,तसेच मास्क,सोशल डिस्टंस इ पालन करत.या रूट मार्चचे टाळ्यांच्या गजरात मनोबल उंचावले