उंब्रज,मसूर,तारळे,चाफळ पोलीस ठाण्यात जप्त दुचाकींचा ढीग

बेफाम नागरिकांना पोलिसांचा हिसका

उंब्रज,मसूर,तारळे,चाफळ पोलीस ठाण्यात जप्त दुचाकींचा ढीग
उंब्रज,मसूर,तारळे,चाफळ पोलीस ठाण्यात जप्त दुचाकींचा ढीग

उंब्रज,मसूर,तारळे,चाफळ पोलीस ठाण्यात जप्त दुचाकींचा ढीग

बेफाम नागरिकांना पोलिसांचा हिसका

उंब्रज/प्रतिनिधी

उंब्रज,मसूर तारळे,चाफळ येथील पोलीस ठाण्याच्या आवारात दुचाकींचा ढीग जमा झाला आहे.कोरोना महामारीचे गांभीर्य नसलेले नागरिक बेफाम होऊन रस्स्यावर आल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हाधिकारी यांच्या सुधारित आदेशाची काटेकोर अंमलबजावणी उंब्रज पोलिसांच्या वतीने मंगळवार पासून सुरू झाली आहे.उंब्रज पोलिसांचे पथक जय्यत तयारीनिशी मैदानात उतरले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होणार असून कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे सांगितले आहे.

चाफळ फाटा,बाजारपेठ रस्ता,चोरे रोड,अंधारवाडी रस्ता याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त आहे मोकाट फिरणारे पोलिसांच्या रडारवर असून कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दलाने कंबर कसली आहे. यामुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये अन्यथा कठोर कारवाई होणार आहे.तसेच वाहनजप्ती सारखे कटू प्रसंग टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच राहावे अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे असे सपोनि अजय गोरड यांनी सांगितले.

मंगळवारी उंब्रज पोलिसांनी केलेल्या  कारवाईत विना मास्क मोकाट फिरणारे २१ जणांवर दंडात्मक कारवाई करून १०५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.तर विनाकारण फिरणारे दुचाकीस्वार यांची ७२ वाहने जप्त करून  मोटारवाहन अंतर्गत केसेस ५१ केसेस करून १०२०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.या कारवाई मुळे उंब्रज परिसरात विनाकारण फिरणारे नागरीक यांना जरब बसली असून बुधवारपासून ही कारवाई तीव्रतेने राबवली जाणार असल्याचे मत सपोनि अजय गोरड यांनी सांगितले.