उंब्रज पोलिसांचा चौकाचौकात खडा पहारा

नियमबाह्य मोकाट फिरणारांची गय केली जाणार नाही

उंब्रज पोलिसांचा चौकाचौकात खडा पहारा
चाफळ फाटा येथे पोलिसांची नाकेबंदी

उंब्रज पोलिसांचा चौकाचौकात खडा पहारा

नियमबाह्य मोकाट फिरणारांची गय केली जाणार नाही

उंब्रज/प्रतिनिधी

जिल्हाधिकारी यांच्या सुधारित आदेशाची काटेकोर अंमलबजावणी उंब्रज पोलिसांच्या वतीने मंगळवार पासून सुरू झाली आहे.उंब्रज पोलिसांचे पथक जय्यत तयारीनिशी मैदानात उतरले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होणार असून कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे सांगितले आहे.

चाफळ फाटा,बाजारपेठ रस्ता,चोरे रोड,अंधारवाडी रस्ता याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त आहे मोकाट फिरणारे पोलिसांच्या रडारवर असून कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दलाने कंबर कसली आहे. यामुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये अन्यथा कठोर कारवाई होणार आहे.तसेच वाहनजप्ती सारखे कटू प्रसंग टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच राहावे अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे असे सपोनि अजय गोरड यांनी सांगितले.