पत्रकार सुरेश सूर्यवंशी यांना शिक्षकेत्तर महामंडळाचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

८ जानेवारी रोजी सांगली येथे वितरण 

पत्रकार सुरेश सूर्यवंशी यांना शिक्षकेत्तर महामंडळाचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

उंब्रज / प्रतिनिधी


पत्रकारितेमध्ये शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर  महामंडळचा राज्यस्तरीय 'आदर्श पत्रकार' पुरस्कार उंब्रज तालुका कराड येथील दै. पुढारी चे पत्रकार सुरेश सूर्यवंशी यांना जाहीर झाला असून, सदर पुरस्काराचे वितरण ८ जानेवारी रोजी सांगली येथे होणाऱ्या शिक्षकेत्तर महामंडळाच्या अधिवेशनात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षकेत्तर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर, राज्य अध्यक्ष अनिल माने यांनी दिली. 


       अन्यायाला वाचा फोडणारी पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून,  शिक्षण क्षेत्रातही आदर्श पत्रकारिता महत्त्वाची मानली जाते. या अनुषंगानेच शिक्षण क्षेत्रातील  पत्रकारितेच्या  योगदानाची दखल घेऊन  राज्य महामंडळाच्या वतीने सुरेश सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले जात आहे.


    महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर  महामंडळाचे  ५० वे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी सांगली येथील धनंजय गार्डन येथे संपन्न होत असून, प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

 

पत्रकार सुरेश सूर्यवंशी यांचे शिक्षकेत्तर महामंडळाचे जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी यांच्या सह  विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.