उंब्रज रोटरीच्या अध्यक्षपदी नितिन पाटील तर सचिव पदी विश्वनाथ केंजळे

उंब्रज रोटरीच्या अध्यक्षपदी नितिन पाटील तर सचिव पदी विश्वनाथ केंजळे

उंब्रज रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नितिन पाटील तर सचिवपदी विश्वनाथ केंजळे यांच्या निवडी जाहीर


   उंब्रज /प्रतिनिधी


    रोटरी क्लब ऑफ उंब्रज या समाजात मैत्रीभाव निर्माण करणाऱ्या सामाजिक क्लबने आठव्या वर्षात पदार्पण केले असुन  सन २०२२-२३   या नूतन वर्षासाठी   उंब्रज रोटरीच्या अध्यक्षपदी नितिन पाटील तर सचिवपदी विश्वनाथ केंजळे यांची निवड करण्यात आली आहे.


    रोटरी क्लब आँफ उंब्रजने या परिसरात मैत्रीभाव जपताना सामाजिक कार्याला हातभार दिला आहे. इंटरनँशनल रोटरीच्या नियमावली नुसार  प्रति वर्षी रोटरीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जातात. त्यानुसार रोटरी ३१३२ चे डिस्कीट गव्हर्नर ॠषीकेश जकोटीया, असिस्टंट गव्हर्नर श्रीकांत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली चालु वर्षासाठी अध्यक्षपदी नितिन पाटील  सचिवपदी  विश्वनाथ केंजळे यांची निवड करण्यात आली.


उंब्रज परिसरात रोटरी सभासदांंच्या सहकार्याने अनेक सेवाभावी उपक्रम राबवले जातात. मागील वर्षाच्या कार्यकाळात रोटरीने कोरोना महामारीच्या अनुषंगाने कोविड सेंटर उभारण्यापासून रुग्णांना आॅक्सीजन पुरवण्या पर्यंत विविध पातळ्यांवर काम केले. तसेच शाळांना मदत, वृक्षारोपण, आरोग्य शिबीरे, शैक्षणिक उपक्रम,  तसेच गरीब गरजूंना  शिलाई मशीन वाटप असे  विविध सामाजिक उपक्रम राबवल्याचे माजी अध्यक्ष इंजि.अजीत जाधव सचिव विनायक जाधव यांनी  सांगितले. यावेळी रोटरीचे आजी माजी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.