आयशरला ट्रकची धडक ;दोन गंभीर

पुणे बंगळुरू महामार्गावरील शिवडे गावच्या हद्दीतील घटना

आयशरला ट्रकची धडक ;दोन गंभीर

उंब्रज/प्रतिनिधी


पुणे बेंगलोर आशयिई महामार्गावर शिवडे तालुका कराड गावच्या हद्दीत आयशर टेम्पो व ट्रकला झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.  शुक्रवार दि.24 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी कराड येथे खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


     याबाबत अधिक माहिती अशी की अशी महामार्गावर शिवडे तालुका कराड गावच्या हद्दीत सातारा ते कराड जाणाऱ्या लेनवर हॉटेल विसावा ढाब्यासमोर आयशर टेम्पो रस्त्याकडे लावला होता. आयशर टेम्पो चालक गाडीत झोप घेत होता.  त्याच दरम्यान पाठीमागून येणाऱ्या ट्रकने आयशर टेम्पोला जोराची धडक दिली.  या धडकेत आयशर टेम्पो पुढे असणाऱ्या अज्ञात वाहनावर जाऊन आदळला यामध्ये आयशर टेम्पो चालक गंभीर जखमी झाला आहे. तसेच पाठीमागे धडक देणाऱ्या ट्रक चालक ही जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आयशर टेम्पो नवा कोरो होता तर पाठीमागून धडक देणाऱ्या ट्रक मध्ये सोयाबीन होते.

शिवडे गावच्या हद्दीत सकाळच्या वेळी हॉटेल विसावा ढिब्यासमोर चहा नाश्ता करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कंटेनर व इतर ट्रक उभे होते. त्या पाठीमागे आयशर टेम्पो चालकाने आयशर लावून तो गाडीत झोप घेत होता. यादरम्यान पाठीमागून येणाऱ्या ट्रकने आयशरला जोराची धडक दिली या धडकेत आयशरच्या केबिनचा चक्का चुर झाला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच चालक गंभीर जखमी झाला आहे. ट्रक चालक ही अपघातात जखमी झाला असून जखमींना उपचारासाठी कराड येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान या परिसरात असणाऱ्या हॉटेल ढाब्यांमुळे सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्याकडेला उभे असतात त्यामुळे अनेक वेळा येथे अपघात झाले आहेत मात्र पोलिसांचे दुर्लक्ष आहे.