उंब्रज येथील शिवस्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच्या हस्ते : संतोष बेडके

उंब्रज येथील शिवस्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच्या हस्ते : संतोष बेडके

उंब्रज/प्रतिनिधी

उंब्रज ता.कराड येथील बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराजांचा १६ फुटी भव्य अश्वारूढ पुतळा उभारणीचे काम शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या वतीने सुरू आहे. परिसरातील दानशूर व्यक्तींनी यासाठी लोकवर्गणीच्या स्वरूपात चांगला प्रतिसाद दिला आहे.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते होणाऱ्या उंब्रज येथील नियोजित शिवस्मारकाचे भूमिपूजन संदर्भात शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे यांनी भेट दिली असल्याची माहिती शिवयोद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष बेडके यांनी दिली आहे.मुख्यमंत्री अधिकचा पन्नास लाखांचा निधीही शिवस्मारक स्थळाला देणार असल्याची माहिती यावेळी बेडके यांनी दिली आहे.


उंब्रज ता कराड येथील बाजारपेठेमध्ये मध्यवर्ती ठिकाणी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा १६ फुटी उंच भव्य अश्वारूढ पुतळा व्हावा अशी अपेक्षा उंब्रज पंचक्रोशीतील  नागरिकांची व शिवप्रेमींची इच्छा बऱ्याच कालावधी पासून व्यक्त होत आहे.सदरचे शिवकार्य संकल्प पूर्तता करण्याची जबाबदारी  शिवयोद्धा प्रतिष्ठान उंब्रज यांनी घेतली आहे. लोकवर्गणीतून पुतळा उभारणीचे काम उंब्रज मध्ये शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या मार्फत चालू आहे .यासाठी शिवप्रेमींचा उदंड प्रतिसाद उंब्रज व आजूबाजूच्या परिसरातून मिळत आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व ना. शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते होणाऱ्या  नियोजित शिवस्मारकाचे भूमिपूजन संदर्भात रविवार दि.२१ रोजी शरदजी कणसे शिवसेना संपर्कप्रमुख सातारा जिल्हा यांनी नियोजित उंब्रज मधील  शिवस्मारक स्थळास भेट देऊन पाहणी केली . 

रविवारी शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे उंब्रज येथे स्वागत करण्यात आले यावेळी ठाण्याचे विभाग प्रमुख श्री गोविंद उबाळे  शिवयोद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष बेडके, उपाध्यक्ष शरद जाधव ,खजिनदार रणजीत कदम, अभिजीत जाधव ,कॅप्टन इंद्रजीत जाधव ,महेश जाधव, तुषार पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख समीर जाधव ,उपजिल्हाप्रमुख दक्षिण अक्षय मोहिते, आधी उपस्थित होते यावेळी बोलताना कापसे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे उंब्रजच्या वैभवात नक्कीच भर पडेल यात शंका नाही.