उंब्रज येथील तारळी नदीत महामार्ग ठेकेदाराने घातला बेकायदेशीर भराव

नदीपात्र प्रदूषित होण्याची भीती,जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याची भूलथाप

उंब्रज येथील तारळी नदीत महामार्ग ठेकेदाराने घातला बेकायदेशीर भराव

उंब्रज/प्रतिनिधी

उंब्रज ता.कराड येथील तारळी नदीपात्रात निर्माण होत असलेल्या पुलाच्या कामात प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरकारभार होत असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे.चुकीच्या पद्धतीने नदीपात्रात भराव टाकलेला आहे.लगतच्या जमिनीवर अनधिकृत कब्जा केला असून ज्या क्षेत्राचा मोबदला अजूनही संबधित जमीन मालकाला मिळाला नाही तरीसुद्धा सदरच्या ठिकाणी बेकायदेशीरपणे वहिवाट महामार्ग ठेकेदाराने सुरू केली असून सदरच्या रस्त्यात चर मारून रस्ता बंद करणार असल्याची स्थानिकांची चर्चा आहे.

तारळी नदीपात्रात केलेला भराव चुकीचा असून यासाठी वापरण्यात आलेली माती अतिशय दूषित आहे यामध्ये केर कचरा तसेच प्लास्टिक मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणाहून वाहणारे पाणी उंब्रज परिसरातील नागरिक पिण्यासाठी वापरत असल्याने आरोग्यास अपायकारक ठरणार आहे. यामुळे उंब्रज परिसरात साथीचे आजार बळावणार असल्याबाबत नागरिक चिंतातुर असून संबधित ठेकेदाराने गैरमार्गाने केलेला भराव तात्काळ दूर करून नदीपात्रात होणारे प्रदूषण थांबवावे अशी मागणी होऊ लागली आहे.

(सविस्तर वृत्त वाचा उद्याच्या दै.प्रीतिसंगम मध्ये)