उंब्रजला दुषित व गढूळ पाण्याचा पुरवठा

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य धोक्यात

उंब्रजला दुषित व गढूळ पाण्याचा पुरवठा

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य धोक्यात

उंब्रज/प्रतिनिधी

उंब्रज ता.कराड येथील ग्रामस्थांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे.कोरीना महामारीच्या पार्श्वभूमीवर सदरची बाब गंभीर असून ग्रामपंचायत प्रशासन सुस्त पडले आहे.

ग्रामपंचायतीनचे अधिकारी फिरतीवर असल्याने कर्मचार्यांच्यावर कोणाचाही अंकुश नसून यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.कृष्णा नदीपात्रातून पिण्यासाठी उचलले जाणारे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नागरिकांना दिले जात आहे.यामुळे साथीचे आजार बळावणार असल्याची शक्यता नागरिक बोलून दाखवत आहेत.कोरोना महामारीची दुसरी लाट येण्याची शक्यता शासन व्यक्त करीत असताना उंब्रज ग्रामपंचायत प्रशासनाचा हलगर्जीपणा भारी पडणार असल्याची चर्चा नागरिकांच्यात आहे.

यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने दूषित पाणीपुरवठा प्रश्नाकडे गंभीरपणे पाहणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत