कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल,दारू दुकानदारांची लगबग सुरू

कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल,दारू दुकानदारांची लगबग सुरू

उंब्रज/प्रतिनिधी

उंब्रज ता.कराड येथील मद्य विक्रेत्या दुकानदारांची रात्री बराच वेळ नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी उपयोजनाची तयारीची लगबग चालू होती,चातक पक्षासारखे वाट बघणारे तळीराम सुखावले असून सकाळी दहाच्या ठोक्याला पहिला नंबर लावण्यासाठी तहानभूक हरपून आनंदात अनेकजण घिरट्या घालत आहेत.

मद्य विक्रेत्यांनी शासन नियमांचे पालन करूनच दारू विक्री करायची आहे,नियम तोडला की तात्काळ दुकान दोन महिन्यासाठी निलंबित करणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले एकही तक्रार चालणार नसून नियमांची कडक आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करणार आहे .

उंब्रज मध्ये ज्या ठिकाणी कंटेन्मेंट क्षेत्र आहे त्या ठिकाणचे मद्य विक्री दुकाने चालू होणार नसून याबाबत सकाळी १० ते सायंकाळी ६ ही वेळ सोडून कोणी दारू विकताना सापडला तर त्याच्या बाटलीवर असणारा बॅच नंबर वरून छडा लावून सदर मद्य विक्रेत्यावर कारवाई करणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले आहे.