उंडाळ्यात सुसज्ज कोविड सेंटर उभारा अन्यथा आंदोलन करू

उंडाळे भागात कोरोनाच्या संसर्गात वाढ होत आहे. परंतु, बाधितांना त्याप्रमाणात ऑक्सीजन बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याची होणारी हेळसांड व गैरसोय दूर करण्यासाठी उंडाळे येथे 50 ऑक्सीजन बेडचे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात यावे. अशी मागणी उंडाळे ग्रामस्थांनी केली आहे. तसेच याची गांभीर्याने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे.

ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना निवेदन देताना सुधीर पाटील, गणेश पाटील व उंडाळकर ग्रामस्थ

ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी : दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा 

कराड/प्रतिनिधी :
         उंडाळे भागात कोरोनाच्या संसर्गात वाढ होत आहे. परंतु, बाधितांना त्याप्रमाणात ऑक्सीजन बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याची होणारी हेळसांड व गैरसोय दूर करण्यासाठी उंडाळे येथे 50 ऑक्सीजन बेडचे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात यावे. अशी मागणी उंडाळे ग्रामस्थांनी केली आहे. तसेच याची गांभीर्याने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे.
        उंडाळे ता. कराड येथे ग्रामसेवक शरद चव्हाण व पोलीस पाटील निवास पाटील यांच्याद्वारा प्रशासनास सोमवारी 21 रोजी सकाळी ग्रामस्थांनी सदर निवेदन दिले. यावेळी सुधीर पाटील, गणेश पाटील व अन्य सजग उंडाळकर ग्रामस्थ उपस्थित होते.

*सविस्तर वृत्तासाठी वाचा उद्याचा दैनिक प्रीतिसंगम*