संचारबंदीला नागरिकांचा कोलदांडा ;पोलीस यंत्रणा मेटाकुटीला

रस्त्यावर पोलिसांच्या धाकाला न जुमानता खुलेआम फिरण्यासाठी बाहेर पडत होते. त्यामुळे जागोजागी विनाकारण गर्दी दिसत होती. कोरोनाला थोपवण्यासाठी पोलीस यंत्रणेने हातात दांडूके घेवून कंबर कसली होती. जिल्हा अधिकारी यांनी सर्व शासकीय यंत्रणाना पेट्रोलपम्प किराणा दुकान व इतर वहातुकीस थोपवण्याचे सक्त आदेश दिले होते त्या आदेशाचे नागरिकांनी उल्लंघन केल्याचे दिसून आल्याने वाई विभागाचे डी वाय एस पी अजित टिके यांनी हा विषय गांभीर्याने घेवून विभागातील भुईंज मेढा कुडाळ वाई पाचगणी महाबळेश्वर येथील अधिकाऱ्याना गावोगावच्या नागरिकांना शिस्तीचे धडे देण्याच्या सूचना केल्या आहेत.

संचारबंदीला नागरिकांचा कोलदांडा ;पोलीस यंत्रणा मेटाकुटीला
वाई शहरात संचारबंदी दरम्यान रस्त्यावरील नागरिकांना हुसकवताना पोलीस

आदेशाचे उल्लंघन केल्यास अटक व किमान 15 दिवस जामीन नाही
वाई/दौलतराव पिसाळ
 वाई तालुक्यात प्रथम कर्फ्यु तरीही जनता रस्त्यावर नंतर संचारबंदी या शासकीय आदेशाला जुगारून गावोगावचे नागरिक अनावश्यक रस्त्यावर पोलिसांच्या धाकाला न जुमानता खुलेआम फिरण्यासाठी बाहेर पडत होते. त्यामुळे जागोजागी विनाकारण गर्दी दिसत होती. कोरोनाला थोपवण्यासाठी पोलीस यंत्रणेने हातात दांडूके घेवून कंबर कसली होती. जिल्हा अधिकारी  यांनी सर्व शासकीय यंत्रणाना पेट्रोलपम्प किराणा दुकान व इतर वहातुकीस थोपवण्याचे सक्त आदेश दिले होते त्या आदेशाचे नागरिकांनी उल्लंघन केल्याचे दिसून आल्याने वाई विभागाचे डी वाय एस पी अजित टिके यांनी हा विषय गांभीर्याने घेवून विभागातील भुईंज मेढा कुडाळ वाई पाचगणी महाबळेश्वर येथील अधिकाऱ्याना गावोगावच्या नागरिकांना शिस्तीचे धडे देण्याच्या सूचना केल्या आहेत.
  कोरोनो या भयंकर रोगाची माहिती नागरीकांना नसल्याचे  परिणाम नागरिकांना भोगावे लागणार आहेत. पोलीस गाडीवरील स्पीकरद्वारे संदेश देवूनही नागरिक दुरुस्त झाल्याचे दिसून न आल्याने विभागातील सर्व पोलीसांना  दिसेल त्याला दुरुस्त करण्याचे आदेश दिल्याने वाई पाचगणी महाबळेश्वर भुईंज कुडाळ मेढा येथील जबाबदार अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी हातात लाठ्या काठ्या घेवून अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांना महाप्रसाद देण्यास सुरवात केली. नागरीक आपल्या कुटूंबा समवेत फिरताना दिसत असल्यामुळे स्वतः डीवायएसपी अजित टिके हे हातात काठी घेवून किसनवीर चौकात गाड्यांचे ताफे अडवून फटके देण्यास सुरुवात केली. वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे उपनिरीक्षक आशिष कांबळे, पीएसआय राजेंद्र कदम,संजय मोतेवार या सर्वांनी वाई शहर व परिसरातील जमलेल्या गर्दीच्या ठिकाणी फटके देण्यास सुरुवात केल्यानंतर नागरिकांना आपल्या चुका लक्षात आल्या आणि भुईंज पोलीस ठाण्या अंतर्गत 40 गावे 17 वाड्या मधील नागरिकांना धडा शिकवण्यासाठी भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनि शायम बुवा व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना रात्रंदिवस फटकवण्यास सुरवात केल्याने वाई पोलीस विभागातील सर्व गावामधील रस्ते पुन्हा निर्मनुष्य झाले आहेत.
 सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनो विषाणूने पॉंझीटीव्ह रुग्ण आढळून येत असताना देखील नागरिकांना या गंभीर विषयाचे गांभीर्य वाटत नसल्याची खंत अजित टिके, आनंदराव खोबरे, श्याम बुवा यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. हा महा भयंकर रोग थोपवण्यासाठी नागरिकांनी  रस्त्यावर येवू नये. जर रस्त्यावर आलेले नागरिक आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करून अटक करण्यात येईल व त्यांना किमान 15 दिवस जामीन मिळणार नाही याची खबरदारी पोलीस प्रशासना मार्फत घेण्यात येणार आहे ,अशी सूचनावजा तंबी यावेळी पोलीस अधिकाऱयांनी दिली.