वांगीतील न्यू इंग्लिश स्कूलला स्वातंत्र्य सैनिकांचे नाव द्या :  ग्रामस्थांची  मागणी 

वांगीतील न्यू इंग्लिश स्कूलला स्वातंत्र्य सैनिकांचे नाव द्या :  ग्रामस्थांची  मागणी 
फोटो ।वांगी येथील न्यू इंग्लिश स्कूल 

 


कडेगाव :प्रतिनिधी
वांगी ता.कडेगाव( सांगली) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या हायस्कूलचे स्वातंत्र्य सैनिक एकनाथ श्रीपती मोहिते  नामकरण करण्यात यावे. अशी मागणी स्वातंत्र्य सैनिक एकनाथ श्रीपती मोहिते यांचे कुटुंब आणि ग्रामस्थांनी संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार  साळुंखे यांच्याकडे केली आहे. 
           निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्य सैनिक एकनाथ श्रीपती मोहिते यांनी स्वातंत्र्योत्तर काळात अनेक मोलाची कामगिरी केली आहे. गावातील मुलांना शिक्षणाची दारे खुली होण्यासाठी आपल्या मालकीची जागा स्वामी विवेकानंद संस्था, कोल्हापूर यांना बापूजी साळुंखे यांच्या शब्दाला  मान देऊन दिली. शाळा चालू करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. त्यांच्या कार्याची परतफेड म्हणून गावकऱ्यांनी शाळेस स्वातंत्र्य सैनिक एकनाथ श्रीपती मोहिते यांचे नाव देण्याच्या मागणीचा ठराव १५ ऑगस्  २०१३ रोजी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला होता. त्या ठरावाचा पाठपुरावा वेळोवेळी संस्थेशी करूनही संस्थेकडून निर्णय घेण्यास उशीर होत आहे. त्यामुळे वांगी ग्रामस्थांनी संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे  यांची भेट घेऊन निवेदन दिले.
       कडेगाव पंचायत समिती उपसभापती रवींद्र कांबळे , जिव्हाळा जनकल्याण सेवाभावी  संस्थेचे अध्यक्ष कृष्णत मोकळे , युवा नेते राजेंद्र मोहिते, कृष्णा साखर कारखान्याचे संचालक ब्रिजराज मोहिते, क्रांती साखर कारखान्याचे माजी संचालक दाजीराम मोहिते, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश एडके,  अँड. अमोल मोहिते, आप्पा सावकर, डी.जी.मोहिते, बबन मोहिते, रोहित मोहिते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.